Desi Jugaad Video | सोशल मीडियावर नेहमीच विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका बाईकवर फक्त 2 जण बसू शकतात. असा वाहतूक विभागाचा नियम आहे. परंतू आज आपण जो व्हिडीओ पाहणार आहोत तो पाहून तुम्ही हैराण व्हाल. कारण एका बाईकवर तब्बल 7 जण बसले आहेत. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, आधी एक व्यक्ती आपल्या बाईकवर बसतो. त्यापुढे आपल्या दोन लहान मुलांना बसवतो. त्यानंतर या व्यक्तीच्या मागे एक महिला बसते. तिच्या सोबत एक लहान मुलगा बसतो. त्यानंतर आणखी एक महिला मागे बसते. ती आणखी एका मुलाला आपल्यासोबत बसवते . असे एकूण 7 जण एका बाईखवर बसलेले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एका बाईकवर 4 मुले, 2 महिला आणि एक पुरूष असा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यावर युजर्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. भारतातच असे देसी जुगाड होऊ शकतात. असे काही युजर्स म्हणत आहेत. परंतू काही लोकांनी हे अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ theadulthumour नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.