Viral Video: मुलांना लहानचं मोठं करणे आजकाल पालकांसाठी खूप कठीण झालं आहे असं चित्र आजकाल दिसतं. कारणही तसंच आहे...आपण अनेक वेळा अशा बातम्या पाहिल्या आहेत. ज्यामध्ये आई किंवा वडील कुठल्या कारणामुळे जर मुलांवर ओरडले तर ते टोकाचे पावलं उचलतात. अशीच एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रेल्वे स्टेशनवर विद्यार्थी रेल्वे पटलावर उभा आहे. अचानक हा विद्यार्थी रेल्वे रुळावर उतरतो आणि रेल्वे रुळावर जाऊन झोपतो...हे दृश्यं पाहून रेल्वे स्टेशनवरील लोकांचे अंगावर काटा येतो. तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर उपस्थित एक इन्स्पेक्टर धावू लागला. त्याच्या साथीदारांनी मिळून त्याला ट्रॅकवरून हटवले. ही संपूर्ण घटना स्टेशनच्या फलाटावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. (Trending Video angry son on the railway track video Viral on Social Media nmp)
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) फिरोजाबाद (Firozabad) जिल्ह्यातील मोठी दुर्घटना टळली. वडिलांच्या शिवीगाळामुळे संतप्त झालेल्या एका विद्यार्थ्याने थेट रेल्वे रुळावर जाऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता.
UP : पिता ने डांटा तो नाराज बेटा लेट गया रेल की पटरी पर।
◆ JRP ने बचाई छात्र की जान, युवक का वीडियो हुआ सोशल मीडिया पर वायरल।
◆ घटना फिरोजाबाद की है। #ViralVideo pic.twitter.com/okoJzRogbD
— News24 (@news24tvchannel) October 7, 2022
चौकशीदरम्यान असं समोर आलं की, तो ITI चा विद्यार्थी आहे. त्याच्या वडिलांनी त्याला काहीतरी खडसावले होते. त्याला आता तोंड दाखवू नकोस असे सांगितले. यामुळे दुखावलेल्यामुळे आत्महत्या करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आला. पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबीयांना बोलावून घेतले. त्यांना समजावून सांगितले आणि नंतर त्याला घरी पाठवले.