Viral Video : कोण आहे ही तरुणी? Kedarnath Dham मध्ये बॉयफ्रेंडला प्रपोज केलं अन् मग...

Kedarnath Couple Viral Video :  केदारनाथ मंदिरासोमर एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला प्रपोज केलं आणि सोशल मीडियावर तिने व्हिडीओ शेअर केल्या. त्यानंतर इंटरनेटवर ही तरुणी ट्रोल होते आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 3, 2023, 11:36 AM IST
Viral Video : कोण आहे ही तरुणी? Kedarnath Dham मध्ये बॉयफ्रेंडला प्रपोज केलं अन् मग... title=
Trending Video Kedarnath dham girl propose boyfriend Couple Viral Video famous vlogger triggers debate google trend

Kedarnath Couple Viral Video : सोशल मीडिया असंख्य व्हिडीओ सेकंद सेकंदाला अपलोड होत असतात. यातील काहीच व्हिडीओ हे नेटकऱ्यांचं लक्ष वेधण्यात यशस्वी होतं. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखा पसरतो. अनेक व्हिडीओ असतात जे कधी चांगल्या गोष्टीमुळे तर कधी त्यातील चुकीच्या कृत्यामुळे व्हायरल होतात. सध्या केदारनामधील एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. (Couple Viral Video)

अन् तिने त्याला...

केदारनाथ धाम परिसरात तिने बॉयफ्रेंडला प्रपोज केलं अन् सोशल मीडियावर साइडवर हा व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ गुगलवर आजचा ट्रेंडिग व्हिडीओ ठरला आहे. कोण आहे ही तरुणी? नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये की ज्यामुळे ही तरुणी यूजर्सच्या निशाण्यावर आहे. 

पिवळ्या साडीतील ती...

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता केदारनाथ मंदिरात पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये एक कपल दिसतंय. तरुणीने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तुम्ही पाहू शकता ते दोघे मंदिराकडे तोंड करुन उभे आहे. अचानक तरुणीचा हात मागे येतो ते पाहून एक जण तिला अंगठी तिच्या हातात देतो. मग ती तरुणी गुडघ्यावर बसून बॉयफ्रेंडला प्रपोज करते. 

अचानक तरुणचं हे असं रोमाँटिक प्रपोजल पाहून बॉयफ्रेंड आश्चयचकित होतो आणि तरुणी त्याच्या बोटात अंगठी घालते आणि बॉयफ्रेंड तिला घट्ट मिठी मारतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Trending Video Kedarnath dham girl propose boyfriend Couple Viral Video famous vlogger triggers debate google trend )

तरुणी ट्रोल

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणी ट्रोल झाली आहे. या व्हिडीओने नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

केदारसभेचे अध्यक्ष राजकुमार तिवारी, धार्मिक स्थळी कपलचं असं कृत्य मान्य नसल्याचं त्यांचं म्हणं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि त्यांच्याकडून नियमांचं उल्लंघन होतं. त्यांनी या व्हिडीओसंदर्भात माहिती गोळण्याचे आदेश दिली आहे. 

हेसुद्धा वाचा - VIDEO : अजमेर दर्ग्यात महिलेच्या डान्सवरून वाद, खादीमांनी व्यक्त केली नाराजी

कोण आहे ही तरुण?

पिवळ्या साडीतील ही तरुणी प्रसिद्ध रायडर गर्ल विशाखा असून ती भारतातील पहिली महिला मोटो ब्लॉगर आहे. तिच्या हिमाचल प्रदेशातील बॉयफ्रेंडला तिने अनोख्या प्रकारे प्रपोज केलं आहे. विशाखा ही अनेक राज्यातील ब्रँड अॅम्बेसेडरही आहे. विशाखाने मुंबई ते कन्याकुमारी असा बाइकने प्रवास केला आहे. सोशल मीडियावर ती प्रसिद्ध असून तिचे 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोव्हर्स आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ ट्वीटरवर Ravisutanjani याने शेअर केला आहे. त्यानंतर अनेक यूजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येतं आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x