दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी ड्रोन उडताना दिसल्याने खळबळ; SPG आणि दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

PM Narendra Modi Residence: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी ड्रोन (Drone) उडताना दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस याप्रकरणी तपास करत असून अद्याप हाती काही लागलेलं नाही.   

शिवराज यादव | Updated: Jul 3, 2023, 10:04 AM IST
दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी ड्रोन उडताना दिसल्याने खळबळ; SPG आणि दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये  title=

PM Narendra Modi Residence: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी ड्रोन (Drone) उडताना दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. एसपीजीने दिल्ली पोलिसांना याची माहिती देताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी 5 वाजता एसपीजीने दिल्ली पोलिसांना माहिती दिली. यानंतर दिल्ली पोलीस या ड्रोनचा शोध घेऊ लागले होते. पोलीस याप्रकरणी तपास करत असून अद्याप हाती काही लागलेलं नाही. 

हा ड्रोन नेमका कोण उडवत होतं, तसंच तो पंतप्रधानांच्या निवासस्थानी कसा पोहोचला याची माहिती पोलीस मिळवत आहेत. तुमच्या माहितीसाठी, पंतप्रधान निवासस्थान आणि आजुबाजूचा परिसर नो फ्लाइंग झोनमध्ये येतो. 

दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे की, "एनडीडी नियंत्रण कक्षात पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ एक अज्ञात वस्तू उडत असल्याची माहिती मिळाली होती. आम्ही आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला असता अद्याप तरी अशी कोणतीच गोष्ट सापडलेली नाही. आम्ही एअर ट्राफिक कंट्रोलशीही संपर्क साधला आहे. त्यांनाही पंतप्रधान निवासस्थानाजवळ असं उडताना काही दिसलं नाही".

पंतप्रधान निवासस्थानी असते कडक सुरक्षाव्यवस्था

पंतप्रधान निवासस्थानात प्रवेश कऱण्यासाठी 9 लोक कल्याण मार्ग येथून जावावं लागतं. सर्वात आधी कार पार्किंगमध्ये लावली जाते. नंतर त्या व्यक्तीला रिसेप्शनवर पाठवलं जातं. तिथे त्याची पुन्हा सुरक्षा तपासणी केली जाते. यानंतर ती व्यक्ती 7, 5, 3 आणि 1 लोक कल्याण मार्गाने प्रवेश दिला जातो. 

पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरक्षाव्यवस्था इतकी कडक असते की, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आली तरी त्यांना या सुरक्षा व्यवस्थेतून जावं लागतं.कोणत्याही व्यक्तीने पंतप्रधान निवासस्थानी प्रवेश कऱण्याआधी सचिवांकडून भेटणाऱ्यांची यादी तयार केली जाते. ज्यांचं नाव या यादीत असेल फक्त तेच लोक पंतप्रधानांना भेटू शकतात. यासह पंतप्रधानांना भेटणाऱ्या व्यक्तीकडे ओळखपत्र असणं गरजेचं आहे. 

लुटियन्स झोनमध्ये बंगला

भारताच्या पंतप्रधानांचं सरकारी निवासस्थान राजधानी दिल्लीतील लुटियन्स झोनच्या लोककल्याण मार्गावरील 7 क्रमांकाचा बंगला आहे. सध्या नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्याने, त्यांचं तिथे वास्तव्य आहे. 2014 पासून नरेंद्र मोदी येथे राहत आहेत. पंतप्रधान निवासाचं अधिकृत नाव 'पंचवटी' आहे. 5 बंगले एकत्र करुन हे निवासस्थान तयार करण्यात आलं आहे. 7 लोककल्याण मार्गावर राहणारे राजीव गांधी हे सर्वात पहिले पंतप्रधान होते. 1984 मध्ये ते येथे आले होते. 12 एकरात हे निवासस्थान उभारण्यात आलं आहे. 1980 मध्ये हे उभारण्यात आलं. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x