Video : समाजाने वेड्यात काढलं, वडील लग्नाला आले नाही, पण तरुणीने तरुणाशी नाही तर...

Trending Video : लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदर आणि खास क्षण असतात. आपल्या आवडता जीवनसाथी मिळाला की मग तर क्या बात है! पण समाजातून लग्नाला विरोध, वडिलांची साथ नाही मग...  

Updated: Dec 20, 2022, 11:34 AM IST
Video : समाजाने वेड्यात काढलं, वडील लग्नाला आले नाही, पण तरुणीने तरुणाशी नाही तर... title=
Trending Video Rajasthan Girl Pooja Married to Lord Vishnu goes viral on Social media nmp

Wedding in Rajasthan : आपल्या समाजात लग्नाला (marriage) खास महत्त्व आहे. लग्न हे अरेंज मॅरेज (arranged marriage) असो किंवा लव्ह मॅरेज (love marriage)...हे प्रत्येक वधू वरासाठी खास क्षण (bride groom video) असतात. आपल्या समाजात अजून काही भागांमध्ये लव्ह मॅरेज करण्यास विरोध होतोत. आपल्या आवडत्या व्यक्तीला जीवनसाथी म्हणून निवड करण्याचा हक्क हा प्रत्येकाचा आहे. पण भारतात आजही आई - वडील आपल्या मुलांचे साथीदार निवडतात. अशातच एका तरुणीने समाजाचा आणि वडिलांच्या विरोधात जाऊन आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न केलं. एवढंच नाही तर या लग्नाची देशभरात चर्चा होते आहे. कारण ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल. 

पूजा झाली आजची 'मीरा'!

नववधूने त्याचा नावाची मेहंदी लावली, वरमाला...सात फेरे..कन्यादानही झालं...अगदी पाठवणीही झाली...आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन किंवा अनोखं आहे. तर थांबा या तरुणीने एखाद्या तरुणाशी नाही, तरुणीशी पण नाही...तर मग लग्न केलं तरी कोणाशी...

समाजाने वेडं ठरवलं, वडिलांनी नकार दिला...

थाट्यामाट्या झालेल्या या लग्नाला समाजातील लोक उपस्थित होते पण त्यांनी तिला वेडं ठरवलं. वडिलही (father) कन्यादानासाठी आले नाही. या वधूच्या पाठीशी उभी राहिली ती एक आई (mother)...आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं काय होतं या लग्नात तर या तरुणीने देवाशी म्हणजे विष्णू देवाशी लग्न (lord vishnu) केलं. म्हणून की काय तिला आजच्या काळातील मीरा म्हणायला हवं. 

कारण ऐकून बसेल धक्का

या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतो आहे. नववधूला या देवाशी लग्ना करण्याचं कारण विचारण्यात आलं तर तिचं उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसेल. ती म्हणाली की, ''मला लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे समाजात वावरत (societys pressure) असताना लोकांकडून अनेक वेळा मला टोमणे ऐकावे लागतं होतं. म्हणून या टोमण्यांना कंटाळून मी मंदिरातील विराजमान असलेल्या ठाकुरजींशी लग्न केलं. ''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोण आहे ती तरुणी आणि कुठे झालं हे लग्न?

हे अनोखं लग्न संपन्न झालं ते राजस्थानमधील जयपूरच्या (Jaipur in Rajasthan) गोविंदगढमध्ये...8 डिसेंबरला पूजा सिंग (Pooja Singh) या 30 वर्षीय तरुणीने देवाशी लग्न केलं. पूजा ही भगवान विष्णूची भक्त असल्याने तिने त्यांना पती म्हणून स्विकारलं आहे.