Viral Video : नवरदेवाचा कहर, लग्नमंडपात नवरीसमोर दुसऱ्या तरुणीला केली Kiss...

Bride Groom Video :  लग्नाचा दिवस...मंडपात वऱ्हाडींची रेलचेल...स्टेजवर नवं वधू आणि वर खुर्चीवर बसले आहेत आणि अचानक नवरदेव असं काही करतो की, एकच खळबळ होते.  

Updated: Jan 29, 2023, 09:12 AM IST
Viral Video :  नवरदेवाचा कहर, लग्नमंडपात नवरीसमोर दुसऱ्या तरुणीला केली Kiss...
Trending Video wedding day groom kissed another girl in front of the bride Shocking video viral on social media

Viral Video Bride Groom  : सोशल मीडिया हा अनेक व्हिडीओच्या खजिना आहे. यात तुम्हाला हसविणारे, रडविणारे, धक्कादायक अगदी विचित्र घटनाचे व्हिडीओ दिसतात. यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. लग्नाचे व्हिडीओ, कपल गोल व्हिडीओ अगदी प्री वेडिंग व्हिडीओ (Pre wedding video) हे सोशल मीडियावर खूप पाहिले जातात. सध्या सेलिब्रिटीची लग्न होतं आहे. रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) याचा धाकट्या मुलाचं अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा साखरपुडा झाला. दुसरीकडे क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) हेदेखील विवाहबंधनात अडकले. त्यानंतर अक्षय पटेल (Akshay Patel) याने त्याची प्रियसी मेहा पटेलसोबत (Meha Patel) लग्न केलं. त्यातच शुक्रवारी सकाळी नीना गुप्ता आणि क्रिकेटर Vivian Richards यांची लेक मसाबाने (Neena Gupta Daughter Masaba Gupta Weddign ) अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्न केलं. सगळीकडे लग्नाचा माहोल आहे. 

नवरदेवाचा कहर!

अशातच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. लग्न मंडपात वऱ्हाडी उत्साहात होते. नवरीदेखील आनंदात होती. लाल लेंहगा, दागिने घालून नवरी नटली, भावी आयुष्याची स्वप्न रंगवत होती. पण नियतीत काही वेगळंच लिहिलं होतं. होणाऱ्या नवरा असं काही करेल याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. त्याचं एक कृत्यामुळे नवरीचं आयुष्य उद्धवस्त झालं. 

नवरीसमोरच त्याने त्या मुलीला...

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता लग्नाच्या स्टेजवर खुर्ची नवरदेव नवरी बसले होते. तिथे काही तरुण मुलंही होते. नवरदेवाला एक मुलगी काहीतरी म्हणत आहे. थोड्या वेळात ती नवरदेवाच्या बाजूला जाऊन बसते आणि हे काय नवरीसमोरच नवरदेव त्या तरुणीला किस करतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by trî55 (@triss180)

व्हिडीओ व्हायरल 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर triss180 या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओ नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. 

(नोट - हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओचा झी24 मीडियाचा काही संबंध नाही. अशा व्हिडीओ आम्ही प्रोत्साहन देत नाही.)