तीन दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

भारतात घुसखोरी करणाऱ्या तीन जहाल दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. 

ANI | Updated: Sep 12, 2019, 03:09 PM IST
तीन दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त
Pic Courtesy: ANI

श्रीनगर : भारतात घुसखोरी करणाऱ्या तीन जहाल दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जम्मू काश्मीर पोलिसांनी केली असून त्यांनी तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे.

जम्मू आणि काश्मीर-पंजाब सीमारेषेवर भारतात घुसखोरी करणाऱ्या या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी दहशतवाद्यांकडून सहा एके-४७ रायफल्स जप्त केल्या आहेत. एका ट्रकमधून शस्त्र जप्त करण्यात आलीत. हा ट्रक पंजाबमधील बामियाल येथून काश्मीरच्या दिशेने चालला होता.

दहशतवाद्यांनी शस्त्र लपवून आणली होती. लखनपूर येथे पोलिसांनी ट्रक तपासणीसाठी थांबवला असता ही कारवाई करण्यात आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी ट्रकमधून शस्त्रांची वाहतूक करत होते. गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जम्मू-पठाणकोट हायवेवर तपासणीसाठी ट्रक थांबवण्यात आला होता. तपासणी केली असता सहा एके-४७ रायफल्स सापडल्या अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक मकेश सिंह यांनी दिली आहे.