close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

दोन दहशतवाद्यांना अटक, हातबॉम्ब आणि एके ४७ जप्त

गंदरबल जिल्ह्यातील नारंग येथे दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

Updated: Oct 14, 2019, 12:06 PM IST
दोन दहशतवाद्यांना अटक, हातबॉम्ब आणि एके ४७ जप्त
संग्रहित छाया

श्रीनगर : गंदरबल जिल्ह्यातील नारंग येथे दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात भारतीय सुरक्षा दलाच्या पथकाला मोठे यश आले आहे. गेल्या तेरा दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरु होते. पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांकडून दारूगोळ्यासह हातबॉम्ब, एके ४७ आणि काही साप्ताहिके जप्त करण्यात आली आहेत.

भारतीय सुरक्षा दलाने पकडलेले दहशतवादी हे दक्षिण आणि मध्य काश्मीरमध्ये घुसखोरी करत होते. नारंग गंदरबल जंगलात या दोघांना भारतीय सैन्याने रोखले. त्यांच्याकडून संशयीत हालचाल सुरु असल्याचे लक्षात येतात सुरक्षा दलाच्या पथकांने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ मोठा दारुगोळा आणि शस्त्र आढळून आलीत. तसेच हातबॉम्बही सापडलेत. ते घातपात करण्यासाठी भारतीय हद्दीत घुसल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, याआधी झालेल्या दहशतवादी चकमकीत दोन परदेशी दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला होता. गेल्या १३ दिवसांपासून परिसरात सर्च ऑपरेशन सुरु होते. पकडण्यात आलेले दोघे अतिरेकी कारवायांसाठी काम करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.