Extra Marital Affair Crime News: उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. मयत तरुणाचे त्याच्याच मित्राच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध होते. मित्राने दोघांना ताकिदही दिली होती. तरीही त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळं संतापलेल्या पतीने एका मित्राच्या मदतीने संपवण्याचा कट रचला. मुख्य आरोपीचा नाव पिंटू असे आहे. तर, मयत तरुणाचे नाव फरहत असं आहे.
आरोपीने त्याचा मित्राला घरी जेवण्यासाठी बोलवले होते. नॉनव्हेज जेवणाचा खास मेजवानीचा बेत त्याच्यासाठी आखला होता. त्याचवेळी आरोपीने त्याच्या ताटात विष मिसळून त्याला खायला दिले. काही वेळाने फरहतची तब्येत बिघडली. काही तरी चुकीचं घडतंय याची जाणीव होताच त्याने त्याच्या भावाला फोन करुन बोलवून घेतलं. सूचना मिळताच्या त्याच्या कुटुंबातील सदस्य घटनास्थळी पोहोचले व फरहतला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी पिंटू आणि सतीशला अटक केली आहे. फरहतचे त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागात मी त्याची हत्या केली अशी कबुली पिंटूने दिली आहे.
क्रुर आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. मित्राचा गळा चिरुन त्याचे रक्त प्यायलाची घृणास्पद घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. कर्नाटकच्या चिक्काबल्लारपुरमधून ही विचलित करणारी घटना समोर येत आहे. दरम्यान आरोपीच्या मित्रानेच त्याच्या मोबाईलमध्ये या प्रकाराचा व्हिडिओ कैद केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपीचे नाव विजय असल्याचे समोर येत आहे. विजयच्या पत्नीचे त्याचाच मित्र असलेल्या मारेशसोबत अनैतिक संबंध होते. याचाच राग मनात ठेवून विजयने त्याला संपवण्याचा कट रचला होता. 19 जून रोजी विजयने त्याच्या जॉन नावाची मित्राची मदत घेत मारेशला जंगलात बोलवले. तिथे त्याचा गळा चिरुन त्याचे रक्त पिऊ लागला. हा भयानक प्रकाराचा व्हिडिओ जॉनने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी आरोपी विजयला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलात एका व्यक्तीला जखमी अवस्थेत पडलेला मारेश दिसला. त्यानंतर त्यांने तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. योग्य उपचार मिळाल्यानंतर मारेशच्या जीवाचा धोका टळला आहे. डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आहे.