Shocking News : मित्राच्या गर्लफ्रेंन्डला (Girlfriend) मित्रच पळून घेऊन गेला किंवा मित्राच्या गर्लफ्रेंन्डवर मित्राचेही प्रेम जडले अशा काही बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण मुलाच्या गर्लफ्रेंन्डसोबत वडिलांना प्रेम झाले असं कोणी सांगितले तर त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र प्रत्यक्षात असं घडलं आहे. ही गोष्ट थोडी वेगळी आहे. वाचताना थोडे कसेतरी वाटेल पण हे प्रत्यक्षात असं घडलं आहे. आपल्या मुलाला त्याच्या प्रेयसीपासून दूर करता करता मुलाचा बापच प्रेयसीच्या जवळ पोहोचला. दोघांनी पळून जाऊन लग्नही केले आणि 13 महिने दोघेही गायब होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि दोघांना कानपूरला परत आणलं. या प्रकारामुळे प्रियकर आणि पोलिसांनाही धक्का बसला.
मुलाला प्रेयसीपासून केले दूर
बापाने मुलाला एका मुलीसोबत पाहिल्यानंतर त्याची समजूत काढून त्याला मुलीपासून दूर केले. मुलाने आपल्या वडिलांचे ऐकले आणि मुलीला सोडून दिले. पण काही दिवसानंतरच वडिल आणि ती मुलगी गायब झाली. मुलीच्या वडिलांना याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करत मुलीला पकडले तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. वर्षभरानंतर दोघांचा शोध लागला आणि मुलाच्या पाया खालची जमिनच सरकली.
मुलाने बापाचे ऐकले अन् फसला...
औरैया जिल्ह्यात राहणाऱ्या कमलेश कुमारने हा धक्कादायक प्रकार केला आहे. कमलेश हा व्यवसायाने गवंडी आहे. 2022 मध्ये तो आपल्या मुलासोबत कानपूरच्या चकेरी येथील एका बांधकामाधीन घरात काम करण्यासाठी आला होता. तिथे कमलेश आणि त्याचा मुलगा मजुरीचे काम करायचे. यादरम्यान, कमलेशच्या मुलाचे तिथेच राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबध जुळले. ही तरुणी कमलेशच्या मुलाला भेटण्यासाठी त्याच्या घरी देखील जात होती. या प्रेमप्रकरणाची माहिती कमलेश कुमारला समजताच त्याने मुलाला फटकारले आणि मुलीसोबतचे संबंध संपवण्यास सांगितले. मुलाने सुरुवातीला न ऐकल्याने त्याला एका खोलीत बंद करुन ठेवले होते. त्यानंतर मुलाने वडिलांचे म्हणणे ऐकले आणि मुलीसोबत प्रेमसंबंध तोडून टाकले.
यादरम्यान मुलाच्या वडिलांची त्या तरुणीसोबत जवळीक वाढली. मग काय दोघांचे प्रेम जुळलं आणि दोघांनी एकत्र पळून जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनंतर दोघेही गायब झाले. यानंतर तरुणीच्या वडिलांना मुलगी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. कानपूरच्या चकेरी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. मार्च 2022 पासून दोघेही गायब झाले होते.
दोघेही सापडले दिल्लीत
त्यानंतर कानपूर पोलिसांनी मुलीला दिल्लीमधून वर्षभरानंतर शोधून काढले. पोलिसांना तपासात आढळून आले की, मुलगी इतर कोणासोबत नाही तर तिच्या प्रियकराच्या वडिलांसोबत पळून गेली होती. तपासादरम्यान पोलिसांनी तरुणीचा फोन ट्रॅकिंगवर टाकला होता. पोलिसांना मुलगी दिल्लीत असल्याचे कळताच त्यांनी दिल्ली गाठली. मात्र तिथे पोहोचताच त्यांनाही धक्का बसला. दिल्लीत ही तरुणी कमलेश कुमारसोबत होती. कमलेश कुमार दिल्लीत एका कारखान्यात काम करत होता आणि भाड्याच्या घरात राहत होता. कमलेशने तिथे लोकांना ही तरुणी आपली मुलगी असल्याचे सांगितले होते. यानंतर पोलीस दोघांनाही घेऊन कानपूरला आले. मात्र यानंतरही तरुणीने कमलेशसोबतच राहण्याचा हट्ट धरला आहे.