उत्तर प्रदेशातील (Uttar Pradsesh) अमरोहा (Amroha) येथील अमदपूर पोलीस ठाण्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. अमदपूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (police inspector) ओंकार सिंग हे निवृत्त झाल्याने पोलीस ठाण्यात निरोप समारंभाचे (farewell) आयोजन करण्यात आले होते. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांनी सेवानिवृत्तीनिमित्त (Retirement) निरोप समारंभ आयोजित केला होता. या निरोप समारंभात डीजेचीही (DJ) व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सर्व पोलीस ठाण्यातील (Police Station) पोलीस डीजेवर (DJ) एकत्र नाचताना दिसले. ओंकार सिंग यांच्या निरोप समारंभात सर्व पोलीस काम सोडून समारंभात इतके व्यस्त झाले की, सायंकाळी चार वाजेपर्यंत पोलिसांचे नाचकाम सुरूच होते. सोमवारी 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत हा कार्यक्रम सुरु होता. (UP Police dance at police station police inspector farewell party complainant kept waiting)
या कार्यक्रमादरम्यान, पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबलसह इतर कर्मचारी 'हो गई तेरी बल्ले-बल्ले,' या पंजाबी गाण्यावर आनंदाने नाचताना दिसले. पोलिसांचा हा कार्यक्रम दिवसभर सुरू असल्याने आजूबाजूच्या लोकांनाही त्रास झाला. यामध्ये पोलीस इतके मग्न झाले होते की पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आलेले लोकही त्यांच्या डान्स संपण्याची वाट पाहून निघून गेले. पोलिसांच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण पोलिसांसाठी आनंद व्यक्त केला आहे. तर अनेकांनी पोलीस ठाण्यात अशा प्रकारे कार्यक्रम करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
दारोगा के विदाई समारोह पर डांस करती अमरोहा जनपद के थाना आदमपुर की पुलिस। pic.twitter.com/eQ0lgDTjJD
— राशिद चौधरी (@CaudhariRasida) November 1, 2022
ट्विटर युजर राशिद चौधरी यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'अमरोहा जिल्ह्यातील आदमपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकाच्या निरोप समारंभात नाचत आहेत, असे कॅप्शन या व्हिडीओसोबत देण्यात आले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत भाष्ये केले आहे. पोलीस अधिकारी अभिषेक यादव म्हणाले की, "ओंकार सिंह यांचा कार्यकाळ खूप चांगला होता. रिटायरमेंट पार्टीत पोलीस कर्मचारी आनंदाने नाचले तर त्यात गैर काहीच नाही."