नवी दिल्ली : बॉलिवूडची भूरळ अनेकांना पडते.
बॉलिवूडच्या झगमगत्या विश्वाचा आपणही भाग व्हावा अशी अनेकांची इच्छा असते. अनेक भारतीय तरूण- तरुणी बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळावा म्हणून ऑडिशन देतात. पण या स्ट्रगलिंग अभिनेत्यांप्रमाणे काही अमेरिकन अधिकारीही हिंदी डायलॉग्जचा सराव करून ऑडिशन देत आहेत.
नवी दिल्लीतील युएस अॅम्बसीमधील काही उच्च पदाधिकारींनी सोशल मिडीया अॅक्टीव्हिटी आणि #USIndiaDostiया मिशनचा एक भाग म्हणून ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये काही अमेरिकन अधिकार्यांनी हिंदी सिनेमातील गाजलेले डायलॉग्ज म्हटले आहेत.
Who loves #Bollywood?We do!Watch our officers audition for their big movie break w/famous Hindi film dialogues!Celebrating #USIndiaDosti pic.twitter.com/13yrZf3mDd
— U.S. Embassy India (@USAndIndia) September 28, 2017
ट्विटरवर अमेरिकन अधिकार्यांना शोले, दीवार,ओम शांती ओम या चित्रपटातील डायलॉग्स म्हटले आहेत. अमेरिकन शैलीतील हिंदी डायलॉग्ज्स ऐकणं भारतीयांनाही मजेशीर वाटत आहेत. बॉलिवूडच्या डायलॉग्सप्रमाणे अनेक भारतीय सण-समारंभाच्या वेळीदेखील युएस अॅम्बसीमधील अधिकारी त्यामध्ये सहभागी होतात. नवरात्र, होळीचा आनंदही ही अधिकारी मंडळी आनंदाने लुटतात.
दिल्लीप्रमाणे मुंबईतील युएस अॅम्बसीमधील अधिकारी अशाच प्रकारे गंमती जंमती करत असतात. नुकताच मुंबईतील कार्यलयात दोस्ती हाऊसची सुरूवात करण्यात आली आहे. दोस्ती हाऊस या उपक्रमाद्वारा भारत आणि अमेरिकेतील सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक संबंध सुधारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अनेकदा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत शिकू पाहणार्यांसाठी खास व्याखानं, सल्ला आणि काही समज- गैरसमज दूर करण्यासाठी उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.