जम्मूत बस स्थानकावर हातबॉम्ब फेकण्यासाठी अल्पवयीन मुलाचा वापर

जम्मूच्या बस स्थानकावर हातबॉम्ब फेकण्यासाठी अल्पवयीन मुलाचा वापर केल्याचं उघड झाले आहे. 

Updated: Mar 8, 2019, 04:53 PM IST
जम्मूत बस स्थानकावर हातबॉम्ब फेकण्यासाठी अल्पवयीन मुलाचा वापर  title=

जम्मू : जम्मूच्या बस स्थानकावर हातबॉम्ब फेकण्यासाठी अल्पवयीन मुलाचा वापर केल्याचं उघड झाले आहे. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. त्यात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हातबॉम्ब फेकण्यासाठी त्याला ५० हजार रूपये हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेकडून मिळाल्याचंही त्याने मान्य केलंय. या मुलाने अजून वयाची १६ वर्षेही पूर्ण केलेली नाहीत. 

या घटनेनंतर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. हा परिसर खाली करण्यात आला असून सध्या पोलिसांचे पथक घटनास्थळी तपास करत आहेत. पोलिसांनी या मुलाचे आधार कार्ड, इतर कागदपत्रं, शाळेतली कागदपत्रं ताब्यात घेतली. त्यात त्याची जन्मतारीख १२ मार्च २००३ असल्याचे उघड झाले आहे. पोलीस आता या मुलाची वयनिश्चिती चाचणी करणार आहेत. कुलगामधला हिजबुलचा स्थानिक म्होरक्या फय्याजने या मुलाकडे हातबॉम्ब दिल्याचे उघड झाल्याचे पोलीस म्हणाले. 
 

गजबजलेल्या जम्मू बस स्थानकात ग्रेनेड हल्ला; १८ जण जखमी

जम्मूच्या बस स्थानकात झालेल्या या हल्ल्यात २ जण ठार तर ३२ जण जखमी झालेत. अल्पवयीन मुलांसाठी असलेल्या सौम्य शिक्षांमुळे दहशतवाद्यांनी आता दहशत पसरवण्यासाठी अल्पवयीन मुलांना हाताशी धरल्याचं यातून उघड होत आहे.