बदायूं: नाटकात भगत सिंह यांची भूमिका साकारयला मिळणं हे स्वप्न उराशी बाळगलेल्या 10 वर्षीय मुलाचं हे स्वप्न अधूरं राहिलं. नाटकाच्या तालमी दरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली.भगत सिंह नाटकाची रंगीत तालीम सुरू होती. यावेळी 10 वर्षीय मुलगा फाशीच्या सीनची तालीम करत होता. त्याच वेळी पायाखालचं स्टूल सरकलं आणि घात झाला.
10 वर्षांच्या चिमुकल्याचा गळफास लागून मृत्यू झाला आहे. भूरे सिंह यांच्या मुलगा गुरुवारी तो घरी एकटाच होता. त्याचवेळी त्याच्या घरी त्याचे मित्रमंडळ आलं. स्वतंत्र्य दिनानिमित्तानं भगत सिंह यांचं नाटक सादर करण्याची योजना ठरली. त्यानुसार नाटकाची रंगीत तालीम सुरू झाली. या मुलाचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते.
15 ऑगस्टसाठी नाटक सादर करता यावं म्हणून ही मुलं अभ्यास करत होती. त्यांनी योजना तयार केली आणि त्यानंतर सराव करायला लागली. 10 वर्षांच्या चिमुकल्याला भगत सिंह यांची भूमिका करण्याची संधी मिळली. फाशीचा सीन करताना त्याच्या पायाखालचा स्टूल खाली पडला. त्यामुळे 10 वर्षांच्या चिमुकल्याच्या गळ्याभोवती फास आवळला गेला आणि त्याचा मृत्यू झाला.
हा प्रकार घडल्यानंतर मुलांनी अजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलवालं. दरम्यान आई-वडील आणि शेजारच्या लोकांनी या मुलाचा मृतदेह खाली उतरवला. फास जोरात आवळला गेल्यानं चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नाटकाची रंगीत तालीम 10 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतली तर सिंह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.