Viral Video: सध्याची तरुणाई पूर्णपणे सोशल मीडियावर (Social Media) अवलंबून आहे. काहींना सोशल मीडियाचं व्यसनच लागलं असून तासनतास त्यात घालवत असतात. तर दुसरीकडे सोशल मीडिया हे कमाईचं एक साधन झालं असल्यानेही काहीजण पैसे कमावण्याच्या हेतून त्याचा वापर करत आहेत. पण हे करताना अनेकजण आपला जीव धोक्यात घालताना दिसतात. युट्यूबला तर अशा बाईक स्टंट करणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, अशाच एका युट्यूबरला (YouTuber) उत्तर प्रदेश पोलिसांनी (Uttar Pradesh Police) धडा शिकवला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी गौतमपल्ली परिसरात स्टंट करणाऱ्या एका ब्लॉगर/युट्यूबर तरुणाची बाईक जप्त केला आहे. स्टंट करत असतानाच त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. इन्स्टाग्राम रिलसाठी हा तरुण रस्त्यावर स्टंट करत मोबाइलवर रेकॉर्ड करत होता.
यानंतर पोलिसांनी त्याला गाठलं. यावेळी गौतमपल्लीचे पोलीस निरीक्षक सुधीर कुमार येथे उपस्थित होते. त्यांना त्याला याप्रकरणी खडे बोल सुनावले. तसंच आपली जीव अशाप्रकारे धोक्यात घालू नको असा मोलाचा सल्लाही दिला. तुझ्या भल्यासाठीच आम्ही तुझी बाईक जप्त करत आहोत असं यावेळी त्यांनी त्याला सांगितलं.
#WATCH | Lucknow, Uttar Pradesh | The motorcycle of a Blogger/YouTuber was impounded in Gautampalli area yesterday after he was seen performing stunts for Instagram reels.
Gautampalli Inspector Sudhir Kumar told him, "...Your parents may not be worried for you but we Police… pic.twitter.com/bG8IJozNos
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 24, 2023
"तुझ्या कुटुंबाला तुझी चिंता नसेल, पण आम्हा पोलीस कर्मचाऱ्यांना आहे. तू सुरक्षित राहावंस अशी आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही ही बाईक जप्त करत आहोत," असं सुधीर कुमार यांनी त्याला सांगितलं. ANI ने हा व्हिडीओ शेअर केला असून, सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
देहरादूनमध्ये वास्तव्यास असणारा अगस्त्य चौहान याचा 3 मे रोजी अपघातात मृत्यू झाला. अलीगड एक्स्प्रेस-वेवर रस्ते अपघातात त्याला जीव गमवावा लागला होता. अगस्त्य चौहानच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासादरम्यान, पोलिसांना बरेच प्रयत्न केल्यानंतर अगस्त्य चौहान वापरत असलेला कॅमेरा सापडला होता. या कॅमेरात अगस्त्य चौहानचे शेवटचे क्षण रेकॉर्ड झाले होते.
अलीगड पोलिसांनी अगस्त्य चौहानच्या फुटलेल्या कॅमेराचा फोटो शेअर केला होता. तसंच या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला अगस्त्य चौहानचा दुचाकी चालवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत अगस्त्य चौहान तब्बल ताशी 294 किमी वेगाने दुचाकी चालवत असल्याचं दिसत आहे. त्याचा हा वेगात दुचाकी चालवतानाचा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
व्हिडीओत अगस्त्य आपण ताशी 300 किमीचा आकडा पार करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. त्याने एका वेळी गाडी ताशी 279 किमीपर्यंत नेली होती. मित्रांनो रस्ता मोकळा आहे, इथे आपण 300 चा टप्पा गाठू शकतो असं तो बोलताना ऐकू येत आहे.