नवी दिल्ली : नव्या वर्षाचं स्वागत जगभरात होत होतं. प्रत्येकजण सेलिब्रेशन करत एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत होतं. मात्र, मथुरा कारागृहात एक विचित्रच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
नव्या वर्षाचं स्वागत सुरु असतानाच मथुरा कारागृहातून तीन कैद्यांनी अगदी फिल्मी स्टाईलमध्ये पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या तीन कैद्यांनी धुक्याचा फायदा घेत पलायन केल आहे. या प्रकरणी कारागृहातील चार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. फरार झालेल्या कैद्यांमध्ये कलुआ, राहुल आणि संजय यांचा समावेश आहे.
#UPDATE Four Jail officials suspended after three undertrial prisoners escaped from Mathura jail
— ANI UP (@ANINewsUP) January 1, 2018
कारागृहातील सूत्रांच्या मते, रात्री उशिरा धुकं इतकं दाट होतं की १० मीटर अंतरावर असलेलंही दिसत नव्हतं. याचाच फायदा घेत बरॅक-१७ मधील तीन कैद्यांनी पलायन केलं आहे.
कारागृह अधिक्षक शैलेंद्र कुमार यांच्या मते, फरार झालेल्या कैद्यांचा रात्रीपासूनच शोध सुरु आहे. फरार झालेल्या कैद्यांमध्ये कलुआ, राहुल आणि संजय यांचा समावेश आहे. कलुआ उर्फ शेरा हा वृंदावनचा निवासी आहे. दुसरा कैदी संजय आग्राचा निवासी तर तिसरा कैदी कुशवाहा हा सुद्धा आग्राचा निवासी आहे. तिन्ही कैद्यांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.