गोरखपूर : निवडणूक जवळ आली की राजकारणी मोठ मोठाली आश्वासन देतात. त्यावर विश्वास ठेवून अनेकदा मतदान होत असते. पण एखादा प्राणी हाच निवडणूकीचा मुद्दा ठरला तर ?
हो. गोरखपूर निवडणूकीत सांड हा निवडणूकीचा मुद्दा ठरला आहे. निवडणूकीत कोण हरणार ? कोण जिंकणार ? हे सांड वरुन ठरणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये महापालिका निवडणुकीचे बिगुल सध्या वाजले आहे. अनेक नेते वेगवेगळी आश्वासने देत आहेत. त्यात सांड हे निवडणूकीचे वातावरण तापवत आहेत. त्यामूळे इथे तर सांड हेच निवडणूकीचे निकाल ठरवणार आहेत अशा चर्चा येथे रंगल्या आहेत.
गोरखपूर महानगरपालिकेत निवडणूकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. गोरखपूरमधील नेते बैलाच्या मुद्द्यावर मतदान करण्याची विनवणी मतदारांना करीत आहेत. जर निवडणुक जिंकायची असेल तर सांड हा निवडणुकीचा मुद्दा असणे गरजेचे असल्याचे उमेदवारांना कळले आहे.
गोरखपूरमध्ये गेल्या साडेतीन वर्षांत सांड प्राण्याने नागरिकांवर केलेले हल्ले चिंताजनक विषय बनत आहे. सांडच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहेत. यावरुन सांडची दहशत कळू शकेल.
एकीकडे सांड च्या हल्ल्यात लोक जखमी झाले आहेत, तर दुसरीकडे माजी महापौर आणि शहराचे कमिशनर सांड पासून सुटका करण्याचे आश्वासने देत आहेत. त्यांच्याप्रमाणे प्रत्येक उमेदवार असे आश्वासन देत असला तरी येथील रहिवाशी सांड च्या दहशतीखालीट सध्या दिवस काढत आहेत.
गोरखपूरच्या रस्त्यांवरुन खुलेआम चालणे फिरणे कठीण झाले आहे. लोकांना रस्त्यावरुन फिरताना काळजी घ्यावी लागत आहे. रस्त्यावर विक्रेत्यांसाठी सांड हा मुद्दा त्रासदायक ठरत आहे. त्यामूळे सांड प्रश्नी इथल्या नागरिकांची सुटका होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.