नवी दिल्ली : माता वैष्णो देवीच्या भक्तांसाठी मोदी सरकार लवकरच मोठे गिफ्ट देणार आहे. देशातील सर्वात अत्याधुनिक आणि वेगवान ट्रेन नवी दिल्ली ते कटारा मार्गावर धावणार आहे. नवी दिल्ली ते कटारा मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लवकरच याचे ट्रायल रन देखील सुरु होणार आहे. 130 किमी प्रति तास वेगाने धावणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमुळे दिल्ली ते कटरा हे अंतर केवळ 8 तासांचे होणार आहे.
नवी दिल्ली ते कटरा स्थानकापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस 3 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. वंदे भारत नवी दिल्ली नंतर अंबाला जंक्शन, लुधियाना, जम्मू नंतर कटरा पोहोचणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या प्लाननुसार वंदे भारत सकाळी 6 वजता नवी दिल्लीच्या कटरा स्थानकातून रवाना होईल. यानंतर सकाळी 8.10 ला अंबाला जंक्शन पोहोचेल. त्यानंतर 2 मिनिटांच्या विश्रांतीनंतर ट्रेन 9.22 वाजता लुधियाना स्थानकात पोहोचेल. 9.24 ला लुधियानातून निघाल्यानंतर वंदे भारत 12.40 वाजता जम्मू तवी स्थानकावर पोहोचेल. इथे 2 मिनिटे थांबल्यानंतर ट्रेन दुपारी 2 वाजता कटरा स्थानकावर आपल्या गंतव्य स्थानी पोहोचेल.
कटराहुन परतल्यानंतर वंदे भारत दुपारी 3 वाजता कटराहुन नवी दिल्लीसाठी रवाना होईल आणि रात्री 11 वाजता नवी दिल्लीत पोहोचेल. या दरम्यान वंदे भारत ट्रेन 4.18 मिनिटांवर जम्मू, संध्याकाळी 7.36 मिनिटांनी लुधियाना आणि रात्री 10.56 मिनिटांनी अंबाला स्थानकावर पोहोचेल. परतीच्या मार्गावर देखील वंदे भारतचा प्रत्येक स्थानकावरील विश्रांती वेळ हा साधारण 2 मिनिटांचाच असेल.