Video : महिलांवर बिबट्याचा हल्ला, LIVE थरार पाहून अंगावर शहारा

Leopard Attack : उत्तरखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढतं आहेत. अशातच महिलांवर बिबट्याचा हल्ला करतानाचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून हृदयाचे ठोके चुकतात.   

Updated: Nov 29, 2022, 03:28 PM IST
Video : महिलांवर बिबट्याचा हल्ला, LIVE थरार पाहून अंगावर शहारा title=
video Leopard Attack in two woman live viral nmp

Leopard Attack in Uttarakhand : उत्तराखंडमधील भिलंगणा ब्लॉकमध्ये 13 वर्षांच्या मुलावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच जंगलात महिलांवर बिबट्याचा हल्लाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्याचा LIVE  थरार पाहून निशब्द व्हायला होतो. 

उत्तराखंडातील धक्कादायक घटना (Uttarakhand Shocking Video)

अल्मोडामधील द्वारहाटमध्ये बिबट्याने (Leopard) दोन महिलांवर हल्ला केला. घटनेच्या वेळी या दोघी महिला जंगलात चारा गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी धानीमनी नसतानाही बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. या व्हिडिओमध्ये तुम्ही हा थरार पाहून शकता. जीवाच्या आकांताने पळत सुटलेल्या महिलांना पाहून आपलाही जीव कासावीस होतो. (video Leopard Attack in two woman live viral) 

हेही वाचा - Video : एका मुलासाठी 5 तरूणींनी तरुणीला झोडपलं, भर जत्रेत झिंज्या उपटल्या, लाथाबुक्यांचा वर्षाव

या दोन्ही महिला मल्ली मिराई गावातील आहेत. या भागातील स्थानिकांना कायम बिबट्याचा हल्ल्याची भीती असते. पोटाची खळगी भरण्यासाठी गावातील स्थानिकांना जंगलात जावं लागतं. जीव धोक्यात घालून ते हे काम करत असतात. अशात आयुष्यातील संघर्षाचं हे भयान वास्तव अंगावर काटा आणणारं आहे. 

धक्कादायक व्हिडिओ

चमोली जिल्ह्यातील गोपेश्वर नगर, हल्दापानी, ला कॉलेज, नायगवाड, घिघरण रोड आणि पीजी कॉलेज परिसरात बिबट्याची दहशत आहे.