विराट कोहली आणि राम रहीमचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल

बलात्कार प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलेल्या गुरमीत राम रहीम याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गुरमीत राम रहीम याच्यासोबत टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली दिसत आहे. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 27, 2017, 06:41 PM IST
विराट कोहली आणि राम रहीमचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल  title=

नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलेल्या गुरमीत राम रहीम याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गुरमीत राम रहीम याच्यासोबत टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली दिसत आहे. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम हा बलात्कार प्रकरणात दोषी आढळल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत राम रहीम याच्यासोबत क्रिकेटर विराट कोहली, आशीष नेहरा पहायला मिळत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बाबा राम रहिम याच्यासमोर काही  क्रिकेटर्स बसल्याचं दिसत आहे.  व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठला आहे यासंदर्भात माहिती मिळू शकलेली नाहीये. तसेच या व्हिडिओची सत्यता झी२४तासने केलेली नाहीये.

बलात्कार प्रकरणात न्यायालयाने गुरमीत राम रहीम याला दोषी ठरवलं. त्यानंतर राम रहीमच्या समर्थकांनी जाळपोळ, तोडफोड करण्यासाठी सुरुवात केली आहे. राम रहिम याच्या शिक्षेबाबत न्यायालय २८ ऑगस्ट रोजी निर्णय देणार आहे.