How's Thaaaaat? नजर रोखून पाहाल हा विकेटचा प्रो मॅक्स स्लो मोशन Video

Viral Video : आपण प्रत्येक जण कधी ना कधी गल्ली क्रिकेट (cricket) खेळलो आहोत. लहानपणी घराच्या आजूबाजूला, कधी शाळेत, अगदी सहलीवर गेल्यावर कुटुंबियांसोबत आपण क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे. सोशल मीडियावर (Social media) गल्ली क्रिकेट खेळतानाचा एक मजेदार व्हिडिओ (Funny video) व्हायरल होतो आहे. तो पाहून नेटकरी हसून लोटपोट झाले आहेत. 

Updated: Dec 1, 2022, 10:04 AM IST
How's Thaaaaat? नजर रोखून पाहाल हा विकेटचा प्रो मॅक्स स्लो मोशन Video title=
video Pro Max Slow Motion Video of Wicket and This amazing story happened for the first time in the history of cricket nmp

Cricket Viral Video : भारतासह जगभरात क्रिकेटप्रेमी (Cricket lover) आहेत. लहानपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक घरात एकतरी क्रिकेटवेडा आपल्याला दिसतो. बुधवारी झालेल्या टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (NZ vs IND) यांच्यातील तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला. न्यूझीलंडने ही मालिका खिशात घातली. आपण प्रत्येक जण कधी ना कधी क्रिकेट ((Cricket Video) खेळलो आहोत. अगदी महिलांनी अनेक वेळा क्रिकेट खेळणाचा आनंदा लुटला आहे. गल्ली क्रिकेट खेळताना एक बॅट आणि बॉल बस एवढंच पुरेस असतं. पण जर बॉल नसेल तर क्रिकेट कसं खेळणार याचा विचार केला आहे का? 

अरे हे काय!

आता तुम्ही म्हणाल की, बॉल नाही तर क्रिकेट खेळणं अशक्यच...पण सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो पाहून तुमचा हा विश्वास फोल ठरले. एवढंच नाही तर जेव्हा फलंदाज आऊट होतो आणि तो रिव्ह्यू मागतो...तेव्हा पुढे जे काही या व्हिडिओमध्ये पाहिला मिळतं ते पाहून नेटकरी हसून लोटपोट झाले आहेत. 

Ohhhh! विकेटचा प्रो मॅक्स स्लो मोशन Video

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, गल्ली क्रिकेट खेळताना एक खेळाडू बॉल नाही म्हणून एका चिमुकल्याचा बॉल म्हणून वापर करतो. थांबा इथेच हसायला सुरुवात करु नका. पुढे जे होतं ते यापेक्षी भन्नाट आहे. फलंदाज आऊट होतो आणि तो अपायरला रिव्ह्यू मागतो. आता या गल्ली क्रिकेटमध्ये कुठे आला कॅमेरा आणि बाकी टेक्निकल गोष्टी...पण तरीही यात जी भन्नाट आयडिया शोधण्यात आली ते पाहून तुम्ही अवाक् व्हाल. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भन्नाट किस्सा घडला आहे. 

नजर रोखून पाहाल हा Video

या व्हिडिओमधील विकेटचा प्रो मॅक्स स्लो मोशन तुम्ही नजर रोखून पाहा. 

हसून लोटपोट झालात ना...हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतो आहे.