नोएडाच्या ग्रँड ओमॅक्स सोसायटीमध्ये महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी श्रीकांत त्यागी याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर महिलांकडून कधी सुरक्षा रक्षक तर कधी निवृत्त सैनिकाला मारहाण केल्याचे धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
त्यानंतर आता एका महिलेने झोमॅटो (Zomato) फूड डिलिव्हरी बॉयला बुटाने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झोमॅटो फूड डिलिव्हरी (zomato food delivery) बॉय ऑर्डर देण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडिओमध्ये झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय शांतपणे उभा असलेला दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 16 ऑगस्टचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ dj नावाच्या ट्विटर युजरने ट्विटरवर पोस्ट केला आहे.
व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने दावा केला की डिलिव्हरी बॉय त्याची ऑर्डर घेऊन जात होता. तिथे शेजारी असणाऱ्या एका व्यक्तीने व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. महिलेने त्याच्याकडून ऑर्डर घेतली आणि त्याला तिच्या बूटांनी मारायला सुरुवात केली, असे पोस्टमध्ये म्हटलं आहे.
त्यानंतर व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने कस्टमर केअरला फोन करत या घटनेची माहिती दिली पण त्यांनी फुड डिलिव्हरी बॉयला त्याच्या वरिष्ठांसोबत संपर्क साधण्यास सांगितले. त्यात असेही म्हटले आहे की डिलिव्हरी पार्टनरला त्याची नोकरी गमावण्याची भीती होती.
त्यानेही कस्टमर केअरसोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कन्नड भाषा येत नव्हती. तसेच त्याला त्याची नोकरी जाण्याची भीती होती, असे व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याने म्हटलं आहे.
युजरने ही घटना घडलेल्या ठिकाणाचा उल्लेख केलेला नाही. या व्हिडिओवर लोक महिलेवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
Hi @zomatocare @zomato, the delivery executive got assaulted while delivering my order (#4267443050). Some woman took the order from him and started hitting him with her footwear. He came to my place crying and terrified that he would lose his job. pic.twitter.com/8VQIaKVebz
— dj (@bogas04) August 15, 2022
घटनेची माहिती मिळाल्यानंतर एका युजरने झोमॅटो कस्टमर केअरला फोन करण्याचा प्रयत्न केला की महिलेवर कारवाई झाली आहे की नाही? तसेच ही महिला आपल्याशी अशी का वागते आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे कळू शकले नाही.
दरम्यान, इतरांप्रमाणे या प्रकरणाचा तपास केल्यानंतर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.