पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाला ४६ वर्षे, देशभरात विजय दिवस

१९७१ च्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशभरात विजय दिवस साजरा करण्यात येत आहे. देशभरातून युद्धातील शहिदांना अभिवादन करण्यात येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 16, 2017, 10:53 AM IST
पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाला ४६ वर्षे,  देशभरात विजय दिवस title=

नवी दिल्ली : १९७१ च्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशभरात विजय दिवस साजरा करण्यात येत आहे. देशभरातून युद्धातील शहिदांना अभिवादन करण्यात येत आहे.

युद्धात पाकिस्तानला धूळ चारली 

देशभर १६ डिसेंबर हा विजय दिवस साजरा करण्यात येतोय. १६ डिसेंबर १९७ रोजी भारताने युद्धात पाकिस्तानला धूळ चारली होती. याच दिवशी ढाक्यात पाकिस्तानी सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या ले. जनरल ए. के. नियाजी यांच्यासमोर तब्बल ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण करुन पराभव मान्य केला होता.

बांग्लादेशचा जगाच्या नकाशावर उदय

या युद्धात १२ दिवसात अनेक भारतीय जवान शहीद झाले होते आणि कित्येक जखमी झाले होते. या युद्धात भारतीय सैन्याचं नेतृत्व सॅम मानेकशॉ यांनी केलं होतं. या युद्धानंतरच बांग्लादेशचा जगाच्या नकाशावर उदय झाला होता. हाच ऐतिहासिक दिवस आणि शहिद जवानांची आठवण म्हणून दरवर्षी १६ डिसेंबरला विजय दिवस साजरा करण्यात येतो.