Fire crackers burstingon car gurugram : दिवाळी नुकतीच पार पडली दिवाळी म्हटलं कि फटाके वाजवणं हे आलाच. पण काही समाजकंटक जाणून बुजून स्टंट करण्याच्या नादात असं काही करून बसतात कि त्यामुळे इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असाच एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral video oin social media) होत असत, यातले बरेच व्हिडीओ हे फार गंभीर असतात आणि त्याची दखल घेतली जाते . गुरुग्रामच्या सायबर हब परिसरात चालत्या कारवर फटाके उडवल्याचा व्हिडिओ समोर (gurugram moving car fire crackers) आला आहे. काही तरुणांनी रस्त्यावर चालत्या गाडीवर फटाके फोडल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कार क्रमांकाच्या आधारे पोलिस तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुरुग्रामच्या सायबर हब भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे. चालत्या कारच्या मागच्या डिकीमध्ये फटाके उडवत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक कार चालकावर जोरदार टीका करत आहेत. त्याच्या अश्या बेजबाबदार वागण्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते असं लोकांचं म्हणणं आहे.
या बेजबाबदार कार चालकावर कारवाई करावी अशी मागणी आता लोक करत आहेत. लवकरात लवकर या कार चालकाला शोधून त्याच्या विरोधात कडक कारवाई व्हावी जेणेकरून भविष्यात कोणीही असा काही करण्यास धजवणार नाही.
या प्रकरणी पोलीस आता आणखी शोधाशोध करत आहेत कर च्या नंबर प्लेटवरुन लवकरच त्याचा शोध घेतला जाईल असं पोलिसांचं म्हणणं आहे.
चलती कार पर रख कर पटाखे जलाने वालों को गुरुग्राम पुलिस ने किया गिरफ्तार#Gurugram @gurgaonpolice pic.twitter.com/TZVJvwAKnw
— Prateek Kumar (@prateekpress) October 28, 2022