Viral Mark Sheet: NEET मध्ये 705 मार्क मिळवले, डॉक्टर होणारच होती… 12 वी फेलचा निकाल आला!

Viral NEET Marksheet: . नीट स्कॅम हा हॅशटॅग घेऊन मेडिकलचे विद्यार्थी अनेक ट्वीट करतायत. त्यामुळे हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होतोय. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 11, 2024, 05:31 PM IST
Viral Mark Sheet: NEET मध्ये 705 मार्क मिळवले, डॉक्टर होणारच होती… 12 वी फेलचा निकाल आला! title=
NEET Scam Exposed

Viral NEET Marksheet: देशभरात सध्या वदग्रस्त नीट परीक्षेच्या चर्चा सुरु आहेत. नीट परीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह उभे केले जात असून सोशल मीडियावरदेखील या परीक्षेचीच जास्त चर्चा आहे. नीट स्कॅम हा हॅशटॅग घेऊन मेडिकलचे विद्यार्थी अनेक ट्वीट करतायत. त्यामुळे हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होतोय. अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून विद्यार्थी या विरोधात बोलू लागले आहेत. दरम्यान एक मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

एका विद्यार्थीनीची नीट परीक्षेची मार्कशीट व्हायरल होत असून परीक्षेत विद्यार्थीनीला 720 पैकी 705 गुण मिळालेले दिसत आहेत. या मार्कशीटच्या सत्यतेबाबत स्पष्टता आली नाही. दरम्यान यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. कारण नीट परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थीनीची बारावीची मार्कशीटही पुढे आली आहे. 

बारावीमध्ये ही विद्यार्थीनी फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयात अनुत्तीर्ण असल्याचे दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या मार्कशीटनुसार बारावीत या विद्यार्थीनीला फिजिक्सच्या थ्योअरी परीक्षेत 100 पैकी 21 आणि प्रॅक्टीकलमध्ये 50 पैकी 33 गुण मिळाले आहेत. 

नीट यूजीच्या पेपरमध्ये या विद्यार्थ्याला केमिस्ट्रीमध्ये 99.861 टक्के आणि फिजिक्समध्ये 99.8903 टक्के मिळाले आहेत.

सोशल मीडियात ट्रोल 

जी विद्यार्थीनी बारावी सायन्सला मुख्य विषयात फेल झाली ती नीट परीक्षेत इतके चांगले गुण कसे काय मिळवू शकते? या विद्यार्थीनीची मार्कशीट अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली जात आहे. हा एनटीएचा स्कॅम तर नाही ना? असा प्रश्न विचारला जातोय. हा दावा खरा आहे की खोटा? हे स्पष्ट झाले नाही.