मांजराशिवाय उंदराच्या वाटेला कोणी जात नाही, ती गेली आणि काय घडलं पाहा व्हिडीओ

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक महिला एका जंगली उंदराप्रती आपले प्रेम व्यक्त करत असते.

Updated: Jun 20, 2021, 08:00 AM IST
मांजराशिवाय उंदराच्या वाटेला कोणी जात नाही, ती गेली आणि काय घडलं पाहा व्हिडीओ title=

मुंबई : प्राणी प्रेमींचं प्राणांवरती खूप प्रेम असते. त्यांन कुठे ही कोणताही प्राणी दिसला तरी ते त्यांच्याप्रती आपले प्रेम व्यक्त करतात. प्राण्यांना प्रेमाने आंजारतात, गोंजारतात आणि खाऊ देखील घालतात. त्यामुळे प्राणी देखील या व्यक्तींना आपलेसे करुन घेता आणि त्यांचे त्या व्यक्तीप्रतीचे प्रेम आपल्या कृतीतून व्यक्त करतात. परंतु कधी कधी प्राण्यांचे प्रेम त्याच्या मालकाला किंवा त्याच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला इतकं महागात पडते की, काही विचारु नका. ज्याला असा अनुभव आला असेल त्याला वेगळे काही सांगण्याची गरज नाही. त्यात जंगली प्राण्यांवरचे प्रेम करताना थोडे सावधच राहावे लागते, कारण ते कधी काय करतील हे आपण सांगू शकतं नाही.

अशा प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक महिला एका जंगली उंदराप्रती आपले प्रेम व्यक्त करत असते.

परंतु हा जंगली उंदीर माणसाळू नसल्याने त्याला ते प्रेम कदाचित आवडले नसावे. म्हणून त्या उंदराने तिच्यावरती उडी मारली आणि तिच्या ड्रेसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करु लागला. त्यानंतर ती महिले इतकी घाबरली की, ती त्याला लांब करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु तो उंदीर तिच्या ड्रेसला असा काही पकडून राहिला की, तो त्या महिलेचा ड्रेस सोडायला तयार नव्हता.

खूप प्रयत्ना करुन त्या महिलेने कसे बसे त्या उंदराला आपल्या ड्रेसमधून बाहेर काढलेच. महिलेला उंदरावरील प्रेम इतके महाग पडले की, आता ती आता उंदरापासून चार हात लांबच राहिल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवर  FailArmy नावाच्या पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहताना तुमच्यापैकी काही लोकं घाबरले असतील, मग या महिलेसाठी हे किती भयानक होते याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करताच त्याला 50 लाखाहून अधीक लाईक्स मिळाले आहेत. तर लोकांनी त्यांच्या सोबतचे असे प्रसंग आणि या महिलेची भावना कमेंट्सच्या माध्यमातून या पोस्टवर व्यक्तं केली आहे.