Viral Video: दमलेल्या 'वधू'ची कहाणी! विधी सुरू असताना भर मंडपात नववधूला आली झोप, पुढे जे झालं ते....

Viral Bride Sleeping Video: लग्नातले व्हिडीओ हे अनेकदा व्हायरल होत असतात. त्यातून अनेकदा हे व्हिडीओ इतकी फनी (Funny Bride Video) असतात की, त्यातील गंमत पाहून इतकं हसायला येतं की काही विचारू नका सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होतो आहे. 

Updated: Apr 23, 2023, 03:22 PM IST
Viral Video: दमलेल्या 'वधू'ची कहाणी! विधी सुरू असताना भर मंडपात नववधूला आली झोप, पुढे जे झालं ते.... title=
@weddingworldpage / Instagram

Viral Bride Sleeping Video: लग्नाचे अनेक व्हिडीओज हे व्हायरल होत असतात. त्यातील सर्वाधिक व्हिडीओ (Viral Bride Video) हे लग्नात होणाऱ्या गंमतीजंमतींचे सर्वाधिक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. ज्यात नववधूला विधी सुरू असताना मध्येच पेंग लागते आणि (Bride Sleeps at Wedding) ती अक्षरक्ष: झोपी जाते. या क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत आणि या व्हिडीओखाली नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. हा फोटो पाहून सगळीकडेच हास्याचे फवारे उडायला लागले आहेत.

मुळात लग्नात वधू आणि वराची अनेकदा खिल्ली उडताना आपण पाहत असतो त्यामुळे नेटकरीही त्यांना ट्रोल करत असतात. असे व्हिडीओ हे सगळीकडेच धुमाकूळ घालत असतात. सध्या या व्हिडीओनंही सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. 

लग्नाचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी आपण सगळेच जणं आनंदी  (Wedding Day Funny Video) असतो कारण आपण आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्नगाठ बांधणार असतो. परंतु त्याचबरोबर अशावेळी आपल्यालाही लग्नाच्या कामांमध्ये, विधीमध्ये दमायलाही होते. एकापाठोपाठ एक विधी पुर्ण करताना आपल्याही नाकीनऊ येतात. त्यातून नववधूला आपल्या अंगावरील भरझरी साडी, भरलेले दागिने यांचाही भार उचलायचा असतो तेव्हा या लग्नाच्या धावपळीत नववधूचीही दमछाक होते आणि झोपही पुर्ण होत नाही तेव्हा अशावेळी मध्येच पेंग येणं, झोपं लागणं अत्यंत साहजिकच आहे. अशीच काहीशी अवस्था या व्हिडीओतील नववधूची झालेली दिसते आहे. 

आजकालची लग्न म्हटलं की, डान्स, संगीत, मेहेंदी आणि भरपूर धम्माल मस्ती. त्यामुळे अशावेळी होणारी धावपळही काही विसरून चालणार नाही. अशावेळी तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसणारी वधू ही दमलेली दिसते आहे. ती लाल रंगाच्या दुल्हनच्या (Bride Sleeps While Performing Pheras) ड्रेसमध्ये दिसते आहे. त्यातून ती विधीसाठी लग्नमंडपात बसली आहे आणि व तिला बसल्या बसल्या पेंग येत तेवढ्यात ती जागी होते आणि नीट उठून बसते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओखाली युझर्स हे नानाविध कमेंट्स करताना दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता की या व्हिडीओखालीही लोकं नानातऱ्हेच्या कमेंट्स करताना दिसत आहेत. अनेकांनी झोप घेणे किती आवश्यक आहे यावर भाष्य केले आहे तर एका युझरनं कमेंट केली आहे की अरे, मी कर विसरूनच गेले होते की आज माझं लग्न आहे, लग्न अजून सुरू आहे? अशी एक फनी कमेंटही काही लोकांनी केली आहे. हा व्हिडीओ इन्टाग्रामवर @weddingworldpage या पेजवरून शेअर करण्यात आला आहे.