Viral Video : धोकादायक! धावत्या रॉयल एनफील्डवर कपलचं Pre wedding shoot

Couple Viral Video : एका कपलचा धोकादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये प्री वेडिंगचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे याही कपलने फोटोशूट करायचं ठरवलं मात्र जीव धोक्यात घालून...

Updated: Apr 26, 2023, 01:07 PM IST
Viral Video : धोकादायक! धावत्या रॉयल एनफील्डवर कपलचं Pre wedding shoot title=
viral video Couple Pre wedding shoot on running royal enfield Trending on Social media

Couple Photoshoot Viral Video : सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. त्यामुळे नवरदेव आणि नवरी आपलं लग्न हटके झालं पाहिजे म्हणून नवीन नवीन युक्ती शोधत आहे. गेल्या काही वर्षांपासून जगभरात प्री वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड आला आहे. आपलं प्री वेडिंग फोटोशूट इतरांपेक्षा कसं हटके होईल याकडे या कपलचा कल असतो. 

नवीन वर्षाला जशी सुरुवात झाली सोशल मीडियावर बाइकवर रोमान्स (Couple Romance Video) करतानाचा कपलचे अनेक व्हिडीओ व्हायरल (Social media Viral Video) झाले. दिवसाढवळा बाइकवर आणि कारच्या रुफटॉपवर कपलचा रोमँटिक अंदाज पाहून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलच धारेवर धरलं होतं. पण दुसरीकडे हे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. शिवाय बाइकवर स्टंट करणाऱ्या अनेक तरुण तरुणीचे व्हिडीओ आपण इंटरनेटवर पाहिले आहेत. 

हीच गोष्ट लक्षात घेऊन की काय या भावी नवऱ्या बायकोने धावत्या बाइकवर प्री वेडींग फोटोशूट (Pre wedding shoot) करण्याचं ठरवलं. लग्नापूर्वी असं जीवाला धोक्यात घालून धावत्या बाइकवरचा हा स्टंट पाहून यूजर्स अवाक् झाले आहेत. 

या तरुण तरुणीने चक्क रॉयल एनफील्डवर प्री वेडींग फोटोशूट केलं आहे. तरुणी बुलेटच्या टाकीवर तरुणाकडे चेहऱ्या करु बसली आहे. अधेमध्ये ती तरुणाला मिठी मारताना दिसतं आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवर योगेश भोसले नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. royal_photography_8888 या पेजवर हा व्हिडीओ पाहिला मिळतो.  कपल काळ्या रंगाच्या रॉयल एनफील्ड बुलेटवर बसलेले दिसत आहे. तर या व्हिडीओमध्ये त्यांचा शेजारी एका कारमध्ये एक व्यक्ती त्यांचा व्हिडीओ काढताना दिसत आहे. (viral video Couple Pre wedding shoot on running royal enfield Trending on Social media)

या व्हिडीओला आतापर्यंत 40 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शिवाय 2 लाख 12 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अशाप्रकारे फोटोशूट करणे हे अतिशय धोकादायक आहे. एक छोटीशी चूक तुमच्यासोबत इतरांच्या जीवावर बेतू शकते.