Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) मनुस्मृती जाळणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तरुणी मनस्मृती जाळत असून नंतर त्याच आगीवर सिगारेट पेटवताना आणि चुलीत घातल्यानंतर त्यावर चिकन शिजवताना दिसत आहे. या तरुणीचं नाव प्रिया दास (Priya Das) असून, ती बिहारच्या शेखपुरा येथे वास्तव्यास आहे. प्रिया दास ही राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) महिलास सेलमध्ये कार्यरत आहे. ती 27 वर्षांची असून व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आपण नेमकं असं का केलं? याचा खुलासा केला आहे.
मनुस्मृतीमध्ये जर महिला मद्यपान करत असतील तर त्यांना अनेक प्रकारे शिक्षा दिली जाऊ शकते. तसंच संबंधितांना शिक्षा देण्याआधी त्यांची जात काय आहे याची माहिती घेतली पाहिजे असा उल्लेख मनुस्मृतीत असल्याचं प्रिया दासने सांगितलं आहे. तसंच आपण ही मनुस्मृती 500 रुपयांत खरेदी केल्याची माहिती तिने दिली आहे.
प्रिया दासने शेअर केलेला मनुस्मृती जाळतानाचा व्हिडीओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट केली असून मनुस्मृती जाळणं चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. तसंच काहींनी तिने धुम्रपान करण्याचा आणि चिकन खाण्याचाही विरोध केला आहे. पण प्रिया दासने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, आपल्या मद्यपानाची आणि चिकन खाण्याची सवय नसल्याचा दावा केला आहे. आपण फक्त विरोध दर्शवण्यासाठी हे कृत्य केल्याचा तिचा दावा आहे.
मेरा उद्देश्य किसी की भावना को आहत पहुंचाना नहीं बल्कि बहुजन समाज में जागरूकता लाना है
जो ग्रंथ महिलाओं को समानता नहीं देता उसको जला देना ही उचित है? अंधविश्वास पाखंड वाद और ढोंग के विचारों पर वार करना मेरा उद्देश्य है? मनुस्मृति दहन बाबा साहब ने
25 दिसंबर 1927 की थी @Vndnason pic.twitter.com/W2j7PAxE2p— Shiv Kumar Chawla ASP (@shiv__ASP) March 6, 2023
"मनुस्मृती जाळणं ही एक क्रिया असून घटना आहे. बाबासाहेबांनी हे जाळण्यासाठी पहिली वीट रचली होती. मनुस्मृती जाळण्यामागे कोणत्याही व्यक्तीला विरोध करण्याचा हेतू नाही. उलट चुकीच्या मानसिकतेला विरोध करणं हाच माझा हेतू असल्याचं," प्रिया दासने सांगितलं आहे. या अशा पुस्तकांमधून कोणालाही कोणतंही ज्ञान मिळत नाही. याउलट त्यातून भेदभाव आणि लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम होत आहे. अशा कोणत्याही पुस्तकाचा विरोधच केला पाहिजे असंही तिने सांगितलं आहे.
"या पुस्तकात व्यक्ती आणि महिलांबद्दल अनेक अयोग्य गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या पुस्तकाचं प्रत्येक पान जाळलं पाहिजे. दलितांनी पुढे येऊन या पुस्तकाचा विरोध केला पाहिजे. समाजात जे काही चुकीचं सुरु आहे त्यामागे मनुस्मृतीच आहे. मग महिलांशी संबंधित गोष्टी असो किंवा लग्नाशी संबंधित असोत. बाबासाहेबांनीही मनुस्मृती जाळली होती,' असं प्रिया दासने म्हटलं आहे.
धुम्रपान करणं हा आपल्या विरोधाचा एक भाग होता असंही तिने स्पष्ट केलं आहे. तसंच मनुस्मृती जाळल्याने आपल्याला भीती वाटत नसून ज्याला जे हवं ते करु शकतात असं जाहीर आव्हानच दिलं आहे.