लग्नाच्या जोड्यात Push Up करणाऱ्या नववधूला तुम्ही पाहिलंत का? Fitness Freak नववधूचा व्हिडीओ पाहा

सध्या सोशल मीडियावर वधूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Updated: Aug 2, 2021, 04:41 PM IST
लग्नाच्या जोड्यात Push Up करणाऱ्या नववधूला तुम्ही पाहिलंत का? Fitness Freak नववधूचा व्हिडीओ पाहा

मुंबई : सध्या सर्वत्र लग्नाचं सिझन असल्यामुळे आपल्या इंटरनेटच्या जगात देखील सर्वत्र लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात. लोकांकडूम देखील असे व्हिडीओ पसंत केले जातात. कारण प्रत्येक लग्नात काही ना काही मजा मस्करी तर सुरुच असते. त्यामुळे लोकांचे असे प्रसंग पाहिल्यामुळे मनोरंजन देखील होतं. तुम्ही सोशल मीडियावर वधू-वराच्या संबंधीत काही घटनांचे व्हिडीओ पाहिले असेल. परंतु सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ तुम्ही कधीही पाहिला नसणार.

सध्या सोशल मीडियावर वधूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नववधू लग्नाचा लेहेंगा घालून पुशअप करत आहे. शक्यतो फार कमी मुली पुशअप करतात. परंतु लग्नाच्या लेहेंग्यात पुश-अप करणारी नववधू तुम्ही पहिल्यांदाच पाहिली असेल.

तसे सध्या कोरोना महामारीनंतर लोकांनी स्वत:च्या आरोग्याकडे आणि शरीराकडे जास्त लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. परंतु व्यायामाबाबत अशी क्रेझ तुम्ही यापूर्वी क्वचितच कधी पाहिली असेल. जिथे वधू तिच्या लग्नाच्या दिवशीसुद्धा तिचा फिटनेस स्किप करत नाही आहे आणि ती सतत एकापाठोपाठ अनेक पुश-अप करत असते.

लोक वधूला लग्नाच्या कपड्यात पुश-अप करताना पाहून खूप आश्चर्यचकित झाले आहेत, कारण लेहेंगा खूप जड आहे आणि तो घालून अशाप्रकारचा व्यायाम करणे हे खूप कठीण आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ लोकांना खूप आवडतात. हेच कारण आहे की बर्‍याच यूझर्सनी व्हिडीओवर भरभरुन कमेंट्स केलं आहे. एका यूझरने लिहिले की, असे दिसतेय की वधू फिटनेसबाबत खूप गंभीर आहे. दुसरीकडे, दुसऱ्या यूझरने लिहिले की, मी एकाद्या वधूला पहिल्यांदा अशा पद्धतीने व्यायाम करताना पाहिले आहे. या व्यतिरिक्त, इतर अनेक यूझरनी या व्हिडीओचे वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केले.