Odisha Tragedy: कोरोमंडल एक्स्प्रेसमधील दुर्घटनेच्या काही सेकंदआधीचा VIDEO आला समोर; थरकाप उडवणारं दृश्य

Odisha Train Accident: कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) दुर्घटनाग्रस्त होण्याआधीचा ट्रेनमधील व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ ट्रेन दुर्घटनाग्रस्त होण्याच्या अवघ्या काही सेकंद आधी शूट करण्यात आला आहे. व्हिडीओ रेकॉर्ड होत असतानाच दुर्घटना घडल्याचं दिसत असून पाहून तुमचाही थरकाप उडेल.   

शिवराज यादव | Updated: Jun 8, 2023, 04:29 PM IST
Odisha Tragedy: कोरोमंडल एक्स्प्रेसमधील दुर्घटनेच्या काही सेकंदआधीचा VIDEO आला समोर; थरकाप उडवणारं दृश्य title=

Odisha Train Accident: ओडिशामध्ये (Odisha) झालेल्या तिहेरी रेल्वे दुर्घटनेनंतर संपूर्ण देश हादरला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandak Express), बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (Bengaluru-Howrah Superfast Express) आणि मालडब्यात झालेल्या धडकेत 288 जणांनी जीव गमावला आहे. तसंच 1000 हून अधिक प्रवासी या भीषण अपघातात जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकातील हा सर्वात भीषण अपघात असून पुढील अनेक वर्ष याच्या जखमा ताज्या राहणार आहेत. दुर्घटनेनंतर या अपघाताचं कारण काय आहे याचे वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. यादरम्यान, दुर्घटनेआधी ट्रेनमध्ये काय स्थिती होती हे दर्शवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

दुर्घटनेनंतर घटनास्थळी डबे एकमेकांवर पडले होते. प्रवाशांचं सर्व साहित्यही सगळीकडे पसरलं होतं. मृतांची आणि जखमींची अक्षरश: रांग लागली होती. त्यातच आता कोरोमंडल एक्स्प्रेसमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ दुर्घटनेच्या काही सेकंद आधीचा आहे. 

Odisha Accident: दुर्घटनेच्या काही सेकंद आधी नेमकं काय झालं होतं? कोरोमंडल एक्स्प्रेसच्या पायलटने केला खुलासा

 

हा व्हिडीओ ओडिशा टीव्हीने शेअर केला आहे. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत सफाई कर्मचारी रात्रीच्या वेळी साफसफाई करत असल्याचं दिसत आहे. स्लीपर कोच असल्याने यावेळी प्रवासी रात्र असल्याने आपापल्या सीटवर झोपल्याचंही त्यात दिसत आहे. यानंतर अचानक कॅमेरा वळतो आणि फक्त लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत आहे. काही वेळाने सगळीकडे अंधार पसरत असून व्हिडीओ बंद होतो. 

सूत्रांच्या माहितीनुसार, हा व्हिडीओ एका प्रवाशाने शूट केला आहे. पण या व्हिडीओची सत्यता पडताळण्यात आलेली नाही. 

सीबीआयकडून तपास

दरम्यान, या दुर्घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. दुसरीकडे रेल्वेने प्राथमिक तपासात सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती दिली आहे. ओडिशा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणामुळे मृत्यू आणि जीव धोक्यात घालणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे बोर्डाने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या लोको पायलट्सना क्लीन चीट दिली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टममध्ये बदल झाल्याने ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ट्रेनने वेगमर्यादा ओलांडलेली नव्हती. ट्रेनला मुख्य मार्गावर जाण्याचा सिग्नल मिळाला, परंतु तो कसा तरी लूप लाइनमध्ये प्रवेश केला ज्यावर एक मालगाडी उभी होती. कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चालकाने आपल्याला हिरवा सिग्नल दिसल्यानेच एक्स्प्रेस त्या मार्गावर टाकली अशी माहिती दिली आहे. 

 

रेल्वे क्रॉसिंगवर काम सुरु होतं, साक्षीदाराचा दावा

बालासोरमध्ये ज्या ठिकाणी दुर्घटना झाली तेथून 20 मीटर अंतरावर राहणाऱ्या मेडिकलचा मालक सौभाग्य रंजन सारंगी याने दावा केला आहे की, दुर्घटना घडली तेव्हा रेल्वे क्रॉसिंगवर दुरुस्तीचं काम सुरु होतं. ट्रॅकवर 10 ते 15 गेटमन होते. गेल्या दोन महिन्यांपासून काम सुरु होतं असा दावा या 25 वर्षीय तरुणाने केला आहे. गेटमनच्या खोलीचं बांधकाम सुरु होतं. दुर्घटना घडली त्या दिवशीही रेल्वे क्रॉसिंगवर काम सुरु होतं असं त्याने सांगितलं आहे.