odisha train tragedy

Odisha Tragedy: कोरोमंडल एक्स्प्रेसमधील दुर्घटनेच्या काही सेकंदआधीचा VIDEO आला समोर; थरकाप उडवणारं दृश्य

Odisha Train Accident: कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) दुर्घटनाग्रस्त होण्याआधीचा ट्रेनमधील व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ ट्रेन दुर्घटनाग्रस्त होण्याच्या अवघ्या काही सेकंद आधी शूट करण्यात आला आहे. व्हिडीओ रेकॉर्ड होत असतानाच दुर्घटना घडल्याचं दिसत असून पाहून तुमचाही थरकाप उडेल. 

 

Jun 8, 2023, 04:13 PM IST

Train Accident मध्ये 40 जणांचा मृत्यूनंतर रेल्वे मंत्र्यांना सुनावलेली मृत्यूदंडाची शिक्षा

Train Accident Death Sentence To Railway Minister: या अपघातामध्ये 40 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 172 प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेमंत्र्यांना पदावरुन हटवण्यात आलं. घटनास्थळावरही नवीन रेल्वेमंत्रीच गेले होते हे विशेष.

Jun 7, 2023, 05:28 PM IST

Odisha Accident: मृतांच्या रांगेत झोपलेला 'तो' अचानक जागा झाला; कर्मचाऱ्याचा पाय पकडला अन् म्हणाला "मी जिवंत..."

Odisha Train Accident: कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) दुर्घटनेत मृत्यू झाल्याचं समजत मृतांच्या रांगेत ठेवलेला 35 वर्षीय रॉबिन याने बचावपथकातील कर्मचाऱ्याचा पाय पकडला आणि आपण जिवंत असल्याचं सांगितलं. यानंतर सर्वांनाच धक्का बसला. त्याला तात्काळ तेथून बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

 

Jun 6, 2023, 07:36 PM IST

Odisha Accident: दुर्घटनेच्या काही सेकंद आधी नेमकं काय झालं होतं? कोरोमंडल एक्स्प्रेसच्या पायलटने केला खुलासा

Odisha Accident: ओडिशामधील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाल्याने रेल्वेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान, या एक्स्प्रेसचे लोको पायलट आणि गार्ड्स मात्र या अपघातातून बचावले आहेत. दुर्घटनेच्या आधी नेमकं काय झालं होतं याचा खुलासा त्यांनी नुकताच केला आहे. 

 

Jun 6, 2023, 12:01 PM IST

Odisha Train Accident: मुलीच्या 'त्या' एका हट्टामुळे वाचले बाप-लेकीचे प्राण! वडिलांनीच सांगितला अनुभव

Coromandel Express Lives Of Father Daughter Saved: या दोघांनाही शनिवारी कटकमधील एका डॉक्टरांची अपॉइण्टमेंट होती. म्हणूनच ते शुक्रवारी रात्री कटकला पोहचण्याच्या दृष्टीने कोरामंडल एक्सप्रेसने कटकला जात होते. त्यावेळी ते प्रवास करत असलेल्या ट्रेनचा अपघात झाला. मात्र ते चमत्कारिकरित्या बचावले ते एका हट्टामुळे.

Jun 5, 2023, 06:19 PM IST

Odisha Train Accident: 275 मृतांपैकी केवळ 104 जणांचीच ओळख पटली! बेवारस मृतदेहांचं काय होणार? सरकारने दिलं उत्तर

Odisha Train Accident Unclaimed Dead Bodies: ओ़डिशामधील हा भीषण अपघातामध्ये एकूण 275 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी केवळ 104 जणांची ओळख पटली आहे. अद्याप 171 जणांची ओळख पटलेली नसून त्यासंदर्भातील प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात आहेत.

Jun 5, 2023, 04:30 PM IST

Odisha Train Accident: 7 मृतदेहांखाली अडकलेला 10 वर्षांचा छोटा भाऊ; मोठा भाऊ रात्रभर शोधत राहिला अन्...

Odisha Train Accident: शुक्रवारी ओडिशामध्ये झालेल्या कोरामंडल एक्सप्रेस आणि यशवंतपुर एक्सप्रेसच्या भीषण अपघातात 1100 हून अधिक प्रवासी जखमी झाले असून एकूण  275 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमधून एक लहान मुलगा चमत्कारिकरित्या बचावला आहे.

Jun 5, 2023, 01:33 PM IST

ओडिशात तिन्ही अपघातग्रस्त ट्रेनच्या मोटरमन्सचं काय झालं? समोर आली माहिती

Odisha Train Accident : ओडिशामध्ये घडलेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 275 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर,1000 हून अधिक प्रवासी जखमी आहेत. या अपघातानंतर जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.. गेल्या दोन दशकतील हा सर्वाधिक भीषण अपघात असल्याचंही म्हटलं जातंय.

Jun 5, 2023, 11:17 AM IST

ओडिशा रेल्वे दुर्घटनेवर राहुल गांधी स्पष्टच बोलले, म्हणाले "काँग्रेसनेच 50 वर्षांपूर्वी..."

Rahul Gandhi on Odisha Train Accident: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क (New York) येथे अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधता भाजपा प्रत्येक समस्येसाठी भूतकाळातील घटनांना जबाबदार धऱते असा टोला लगावला. कोणत्याही प्रश्नावर ते काँग्रेसने काही वर्षांपूर्वी केलं होतं असं उत्तर देतात असा टोाला त्यांनी लगावला.

 

Jun 5, 2023, 10:10 AM IST

Odisha Train Accident: ओडिशा ट्रेन अपघानंतर गौतम अदानींची मोठी घोषणा! म्हणाले, "ओडिशा रेल्वे दुर्घटनेमुळे आम्ही..."

Train Accident In Odisha: शुक्रवारी झालेल्या अपघातामध्ये एकूण 275 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एकूण 1100 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या मार्गावरील रेल्वे वाहतूक डागडुजीनंतर तब्बल 51 तासांनी सुरु करण्यात आली आहे.

Jun 5, 2023, 09:29 AM IST

Odisha Train Accident: ....अन् रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना अश्रू अनावर; म्हणाले "आमची जबाबदारी अद्यापही...."

Odisha Train Tragedy: ओडिशामध्ये (Odisha Train Accident) तीन ट्रेनमध्ये झालेल्या विचित्र अपघातानंतर दुर्घटनास्थळी दोन दिवसांनी रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर आता वाहतुकीसाठी रेल्वे मार्ग तयार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. मात्र हे सांगत असताना बेवारस मृतांचा उल्लेख करत त्यांना अश्रू अनावर झाले. 

 

Jun 5, 2023, 08:31 AM IST

Odisha Train Accident: दुर्घटनेनंतर 51 तासांनी धावली पहिली ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी हात जोडून केलं मृतांना अभिवादन

Odisha Train Accident: ओडिशामधील (Odisha Train Accident) बालासोर येथील दुर्घटनेनंतर 51 तासांनी ट्रॅकवर पहिली ट्रेन धावली आहे. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) स्वत: घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी हात जोडून यावेळी मृतांना अभिवादन केलं. दोन्ही रेल्वे ट्रॅकवर सेवा सुरळीत करण्यासाठी संपूर्ण टीम झोकून काम करत होती असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. 

 

Jun 5, 2023, 07:35 AM IST

Odisha Train Accident: मृतांची संख्या 288 वरुन 275 वर; नक्की घडलं तरी काय? सरकारने केला खुलासा

Odisha Train Accident : तीन रेल्वे गाड्यांच्या भीषण अपघातानंतर शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुरुवातीला रेल्वेने दिली होती. मात्र आता ओडिशा प्रशासनानुसार 275 जणांचाच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे

Jun 4, 2023, 05:00 PM IST