Viral Video : मासा तळायला गरम तेलात टाकला अन् तो जिवंत झाला...video पाहाल तर थक्क व्हाल

viral video :  तेलात पडल्या पडल्या हा मासा अचानक जिवंत होतो, पाण्यातून काढल्यावर ज्या प्रकारे मासा जगण्यासाठी तडफडतो तसाच तो उकळत्या तेलात तडफडू लागतो. हा व्हिडीओ पाहून अक्षरशः हृदय पिळवटायला होतं. (heart melting video of fish)

Updated: Jan 20, 2023, 01:15 PM IST
Viral Video : मासा तळायला गरम तेलात टाकला अन् तो जिवंत झाला...video पाहाल तर थक्क व्हाल  title=

Viral video : सध्या थंडी आहे, वाढत्या थंडीत मांसाहारावर (winter and nonveg) भर दिला जातो त्यातही गरमागरम मासे खाणं म्हणजे वाहव्वा! अगदी पर्वणीच...तसंपाहिलं तर मासे बनवणं फार अवघड काम नाहीये पण तितकेही सोपसुद्धा नाहीये. 
सध्या मार्केटमध्ये माश्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, कारण थंडीच्या दिवसात मासेप्रेमी माशांची मोठ्या प्रमाणात मागणी करत आहेत आणि त्यांची आवक बाजारात कमी झालीये त्यामुळे मासळी बाजारात सध्या माश्यांच्या  किमतीने चांगलाच उच्चांक गाठलाय. (fish price increses)
हल्लीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (viral video) होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला आहे.  सोशल मीडियावर (social media viral video) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं, व्हायरल होत असलेले व्हिडीओ किंवा फोटो लोकांकडून खूप पाहिले जातात आणि वाऱ्यासारखे इंटरनेटवर पसरतात. काही व्हिडीओ विचार करायला लावणारे असतात तर काही पोट धरून हसायला लावणारे असतात. 

आता जो व्हिडीओ व्हायरल (viral video) होतोय तो पाहून हसावं कि आवाक होऊन पाहावं असाच विचार तुमच्या डोक्यात येईल हे नक्की. आणि मुळात हा व्हिडीओ (trending video) पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे कळू शकलं नाहीये पण आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता, एक व्यक्ती पॅन गरम करायला ठेऊन देतो त्यात तेल घातलंय आणि आता त्यात तो एक मस्तपैकी मासा ज्याला छान मॅरीनेट (fish fry recipe) केलं आहे तो घालतो,आणि तोच गरमागरम तेलात पडल्या पडल्या हा मासा अचानक जिवंत होतो, पाण्यातून काढल्यावर ज्या प्रकारे मासा जगण्यासाठी तडफडतो तसाच तो उकळत्या तेलात तडफडू लागतो. हा व्हिडीओ पाहून अक्षरशः हृदय पिळवटायला होतं. 

जो व्यक्ती मासा फ्राय करायला टाकतोय त्या व्यक्तीच्या जेव्हा हे लक्षात आलं कि हा मासा जिवंत आहे तेव्हा मात्र त्याने हा पॅन लगेच गॅसवरून बाजूला घेतला मात्र तोपर्यंत त्या माश्याने जीव सोडला होता. पण त्याची जगण्याची तडफड पाहून व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाला चटका बसला असणार हे नक्की. (viral fish video)

सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल  (viral video on social media) होतोय अनेक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि त्यावर कॉमेंट्स सुद्धा केल्या आहे.