खारूताई करतेय योगा... तुम्हाला जमतंय का असं? पाहा व्हिडीओ

खारुताईचा Stretching Exercises तर पाहा....तुम्हाला जमतंय का असं? पाहा व्हिडीओ

Updated: May 5, 2022, 12:25 PM IST
खारूताई करतेय योगा... तुम्हाला जमतंय का असं? पाहा व्हिडीओ title=

मुंबई : धावपळीच्या जीवनात व्यायाम आणि योगा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याने मन आणि शरीर दोन्ही उत्तम आणि निरोगी राहातं. हे आता प्राण्यांनाही समजलं आहे. प्राणीही योगा करण्याच्या मागे लागले आहेत. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

काही दिवसांपूर्वी कोब्राचा प्राणायाम करताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता छोट्याशा खारुताईचा योगा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आता एक खारुताईच्या पिल्लाचा व्हि़डीओ चर्चेत आला आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की खारूताई स्ट्रेचिंग व्यायाम करताना दिसत आहे. तिचा हा क्युट व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. योग नावाच्या युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला हजारांच्या घरात लोकांनी पाहिलं आणि रिट्वीट केलं आहे. काही युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. 

या खारुताईचे पंजे खूप भीतीदायक आहेत असं एक युजर म्हणतो. दुसरा म्हणतो ती योगा करते. तिसरा म्हणतो तिच्या तोंडात खाणं खूप जास्त असल्याने गाल असे आहेत. काहींनी तर खारुताई खूप सुंदर असल्याच्याही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने मांजरीचा सर्कशीत रिंगमधून उड्या मारतानाचा व्हिडीओ प्रतिक्रिया म्हणून पोस्ट केला आहे. या खारुताईची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.