जेव्हा नववधू होणाऱ्या नवऱ्याला भर मंडपात 'माझ्याशी लग्न का करतोयस?' असा प्रश्न विचारते...

या व्हिडीओमध्ये वधूने नवरदेवाला कॅमेरासमोर असा प्रश्न विचारला की, तो चक्रावून गेला.

Updated: Dec 6, 2021, 12:14 PM IST
जेव्हा नववधू होणाऱ्या नवऱ्याला भर मंडपात 'माझ्याशी लग्न का करतोयस?' असा प्रश्न विचारते...

मुंबई : सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे. सोशल मीडियावर देखील आपल्याला लग्नाचे असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यांपैकी काही व्हिडीओ हे खूप मजेदार असतात, तर काही व्हिडीओ विधीदरम्यानचे असतात. आजचा जमाना बदलला आहे, त्यामुळे लग्नात तुम्हाला वधू आणि वर दोघेही खूप धमाल करताना दिसतात. मजा मस्करी करताना दिसतात. हे क्षण कॅमेरामध्ये देखील टिपले जातात. जे नंतर सोशल मीडियावरती व्हायरल केले जातात.

सध्या सोशल मीडियावरती एका लग्नातील व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो खूप मजेशीर आहे आणि तुम्हाला देखील तो पाहून आनंद होईल.

या व्हिडीओमध्ये वधूने नवरदेवाला कॅमेरासमोर असा प्रश्न विचारला की, तो चक्रावून गेला. मात्र, नवरदेव देखील काही कमी नाही नववधूच्या प्रश्नाला त्याने देखील एकदम मजेशीर उत्तर दिलं.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये वधूने आपल्या नवरदेवाला जाहीरपणे विचारले की, तू लग्न का करत आहेस? यावर वराने हसून उत्तर दिले, 'कारण मला शांती नको आहे.' हे ऐकून तिथे उपस्थित सर्व पाहुणे आणि नातेवाईक जोरजोरात हसू लागले.

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे

Prashanth_bionic नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. या व्हिडीओला 16 लाख 63 हजार लोकांनी लाईक केले आहे, तर 10 लाख वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. इतर अनेक वापरकर्त्यांनी देखील या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'मला देखील एक समस्या हवी आहे, हा व्हिडीओ खूप चांगला कॅप्चर झाला आहे.'

तुमचं लग्न झालं नसेल आणि लग्नात तुमच्या बायकोनं हा प्रश्न विचारला तर? या प्रश्नावर तुमचं काय उत्तर असेल? आम्हाला कळवा.