केसाला आग लागली, परंतु तरीही महिला कामात व्यस्त... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये एक महिला जेवण करताना व्यस्त असल्याचे तुम्ही पाहू शकता.

Updated: Sep 22, 2021, 02:08 PM IST
केसाला आग लागली, परंतु तरीही महिला कामात व्यस्त... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ title=

मुंबई : बऱ्याचदा आपण हे पाहिले आहे की, लोक आपल्या आवडीच्या कामात इतके दंग होतात की, त्यांना वेळ-काळ कशाचेच भान राहत नाही. ते आपल्या कामात इतके मग्न होताता की, त्यांना त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडेही लक्ष नसतं. आपले काम मन लावून करणे हे चांगले आहे, परंतु आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवणे तेवढेच महत्वाचे आहे नाहीतर त्याचे परिणाम भयानक होऊ शकतात. याचेच एक उदाहरण सांगणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्याला चांगले वाईट, मजेदार सगळ्याच प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळताता, ज्यामुळे आपले मनोरंजन तर होतेच, परंतु काही व्हीडीओमुळे आपल्याला शिकायला देखीस मिळते.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये एक महिला जेवण करताना व्यस्त असल्याचे तुम्ही पाहू शकता. ही महिला काम करताना मधेच काहीतरी सामान काढण्यासाठी खाली वाकते, परंतु त्यादरम्यान या महिलेच्या केसांना आग लागते. परंतु तरीदेखील या महिलेला हे समजत नाही. या प्रकारावरुनच तुमच्या लक्षात येईल की, ही महिला किती आपल्या कामात व्यस्त आहे.

ही महिला केसाला आग लागल्यानंतर देखील जवळ जवळ 30 सेकंदपेक्षा जास्त काळ आपलं काम करत रहाते, परंतु तरी देखील तिला परिस्थितीचे भान नसते.

हा व्हिडीओ ट्विटर यूझर @Jamie24272184 ने शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटले आहे, की कसे काय या महिलेला आपल्या केसांना आग लागल्याचे लक्षात येत नाही?

केसांना आग लागल्य़ानंतर काही वेळ असाच गेल्यानंतर या महिलेच्या लक्षात येते की, आपल्या केसांना आग लागली आहे, ज्यानंतर ती हाताने आपल्या डोक्यावरील ही आग विझवण्याचा प्रयत्न करते आणि या महिलेचं नशिब इतकं चांगलं असतं की, ही आग लगेच विझते आणि जास्त हानी पोहोचत नाही.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच या व्हिडीओवर लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका वापरकर्त्याने सांगितले की, कधीकधी कामात जास्त व्यस्त राहण्याचा हा परिणाम असू शकतो, म्हणून आपण नेहमी कोणतेही काम करताना सतर्क असावे.