मॉल, सिनेमाघरातील टॉयलेट खालच्या बाजूने Open का असतात? याची काही कारणे जाणून घ्या

यामागचे एक ठरावीक कारण नाही. परंतु असे मानले जाते की, अनेक कारणांमुळे हे केले गेले आहे.

Updated: Sep 22, 2021, 01:29 PM IST
मॉल, सिनेमाघरातील टॉयलेट खालच्या बाजूने Open का असतात? याची काही कारणे जाणून घ्या

मुंबई : भारतातील सार्वजनिक शौचालय म्हटलं की, लोकांच्या डोळ्यासमोर येतात ते घाण आणि गलिच्छ शौचालय. ज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात थूंकलेलं आणि घाण साचलेली असते. भारतातील फार कमी अशी सार्वजनिक शौचालये आहेत जे स्वच्छ आणि साफ असतात. अशीच साफ आणि स्वच्छ शौचालये आपल्याला मॉल्स, चित्रपटगृहे आणि खाजगी इमारतींमध्ये दिसताता.

परंतु तुम्ही जर या शौचालयांना निट पाहिले असेल, तर तुम्हाला त्यांचे दरवाजे तळापासून अर्धवट दिसतात किंवा हे पूर्णपणे झाकलेले दिसत नाही. परंतु तुम्ही कधी असा विचार केलाय की, असे का घडते? असे करण्यामागे नक्की काय कारण असू शकते? आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.

तसे पाहाता यामागचे एक ठरावीक कारण नाही. परंतु असे मानले जाते की, अनेक कारणांमुळे हे केले गेले आहे. म्हणजेच असे केल्याने अनेक फायदे होतात आणि या कारणास्तव ही संकल्पना स्वीकारली गेली आहे.

हे सहज साफ करता येते

शौचालयाचा दरवाजा तळापासून कापण्याचे किंवा कमी ठेवण्याचे एक कारण स्वच्छता आहे. असे केल्याने, शौचालय सहजपणे साफ करता येते आणि दरवाजामागे घाण देखील साठवून ठेवली जात नाही. तुम्ही हे पाहिले असेल की, ज्या सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे पूर्णपणे बंद ठेवले जातात, त्या शौचालयात घाण साचलेली असते. म्हणूनच ही पद्धत वापरली गेली आहे.

मदत मिळवणे सोपे आहे

जर कोणाला शौचालयामध्ये कोणत्याही वस्तूची गरज असेल तर इतर वॉशरूम वापरणारी व्यक्ती किंवा बाहेर उभी असलेली व्यक्ती त्यांना मदत करू शकते. बऱ्याचदा हे अशा परिस्थितीत उपयोगी पडते जेव्हा शौचालयात टॉयलेट पेपर संपतो, अशावेळी कोणीही सहजपणे दुसऱ्याची मदत करू शकतो.

आपत्कालीन परिस्थितीतही उपयुक्त

जेव्ही एखादी व्यक्ती वॉशरूममध्ये आजारी पडते किंवा एमरजन्सी गरज पडते अशावेळी हे दरवाजे उपयूक्त ठरतात.

डिस्टर्ब होत नाही

सार्वजनिक शौचालयामध्ये एकामागून एक व्यक्ती शौचालयात येत असते. परंतु दरवाजा बंद असल्यामुळे आतमध्ये कोणी बसले आहे की, नाही हे कळत नाही. परंतु दरवाजा अर्धा खुला असल्यामुळे बाहेरच्या व्यक्तीला हे कळते की, आत कोणी आहे, ज्यामुळे तो दरवाजा नॉक करत नाही आणि त्यामुळे आतील व्यक्तीला डिस्टर्ब होत नाही.

नशा रोखण्यास मदत होते

आपण हे पाहिलच आहे की, काही सार्वजनिक टॉयलेटचा लोक  नशा करण्यासाठी जसे सिगरेट पिण्यासाठी किंवा गुटखा खाण्यासाठी वापर करताता. परंतु दरवाजा खालून अर्धा उघडा असल्याने अशा गोष्टींना आळा घालण्यात देखील मदत मिळते, तसेच यामुळे शौचालये खराब देखील होत नाही.