Viral News : शालेय जीवनात अनेक मुलांना यश-अपयशाचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात. तर काही विद्यार्थी कधी अभ्यास न केल्यानं तर कधी परिस्थितीमुळे नापास होतात. पण कुटुंबियांपेक्षा शेजारपाजारच्यांकडून किंवा नातेवाईकांकडूनच मुलांना अधिक टोमणे सहन करावे लागतात. मुलांना चारचौघात चिडवलं जातं. याचा खोल परिणाम मुलांच्या बाल मनावरही होतो. यामुळे मुलं एकलकोंडी होऊ लागतात. या प्रश्नाशीच जोडलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत
व्हायरल होणारा हा व्हिडिओ अशाच टोमणे मारणाऱ्या आणि टीका करणाऱ्यांसाठी सणसणीत चपराक लगावणारा आहे. एक मुलगी सलग दोन वर्ष परिक्षेत नापास झाली. पण यानंतरही तीने जिद्द सोडली नाही. तिसऱ्या प्रयत्नात तीने पास होऊन दाखवलं. मुलीच्या यशावर तिच्या आईने अनोख्या पद्धतीने आनंद व्यक्त करत शेजारच्यांची तोंड बंद केली.
सोशल मीडिया एक्सवर @jpsin1 नावच्या हँडलवरुन हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडिओबरोबर एक पोस्टही शेअर करण्यात आली आहे. दोन वर्ष परिक्षेत अपयश आल्याने परिसरात राहाणाऱ्या शेजारच्यांकडून मुलीला येता-जाता टोमणे ऐकावे लागत होते. मुलगी दहावीची परिक्षा देत होती. पण तिला दोनवेळा अपयशाचा सामना करावा लागला. दोन वर्ष नापास झाल्याने शेजारी आणि नातेवाईकांकडून मुलगी आणि तिच्या कुटुंबियांवर टीका केली जाऊ लागली. मुलगी कधीच पास होऊ शकत नाही, तिचं पुढे काहीच होणार नाही असं ऐकवलं जाऊ लागलं
पण मुलगी हिम्मत हरली नाही. तिसऱ्या प्रयत्नात मुलीने दहावीची परीक्षा चांगल्या उत्तीर्ण होऊन दाखवलं. मुलीच्या या यशाने तिची आई आनंदाने भारावून गेली. जे शेजारी टोमणे मारत होते, त्यांच्या घरासमोर जाऊन मुलीच्या आईन ढोल वाजवला आणि टोमणे मारणाऱ्या शेजारच्यांची तोंड बंद केली. पण मुलीला आईचा हा पवित्रा फारसा आवडलेला दिसत नाही. या व्हिडिओत मुलगी आपल्या आईला थांबवताना दिसत आहे.
यह मुलाती है दो बार दसवीं क्लास में फेल हो गई थी
पूरे मोहल्ले की महिलाएं ताना मारती थी कि तुम्हारी बेटी कभी पास नहीं हो पाएगी ब्ला ब्ला ब्ला
फिर जब बेटी तीसरी बार के प्रयास में पास हो गई तब मां ने पूरे मोहल्ले में पड़ोसियों के घर के आगे ढोल बजाकर पड़ोसियों को उनके ताने का… pic.twitter.com/CTcTAFgKqN
— Jitendra pratap singh (@jpsin1) May 21, 2024
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत सहा हजार लोकांनी लाईक केलं आहे. तर अनेक युजर्सने प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. एका युजरने म्हटलंय त्या मातेने शेजारच्यांना जशास तसं उत्तर दिलंय. तर एकाने म्हटलंय त्या माऊलीला सॅल्यूट. टोमणे मारणाऱ्या शेजारच्यांना योग्य भाषेत उत्तर दिल्याचं अनेकांनी म्हटलंय.