Viral Video : सोशल मीडियावर क्षणा क्षणाला असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मनोरंजन करणारे असंख्य व्हिडीओ असतात. सध्या Reel चा जमाना असल्याने इन्स्टाग्राम असो किंवा फेसबूक यासारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो यावर तुम्हाला याचा भरीमार दिसेल. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक वेळा धक्कादायक आणि भयानक व्हिडीओ पाहिला मिळतात. असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. हा व्हिडीओ एका अपघाताचा असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय.
बस अपघाताचे अनेक व्हिडीओ आणि बातम्या आपण पाहिल्या आहेत. पण बसचा हा विचित्र अपघात पाहून तुम्ही भयभीत व्हाल. बसने कुठे प्रवासासाठी जायचं असेल तर आपल्याला बस स्टॉपवर जावं लागतं. बस स्टॉपवर प्रवाशांसाठी बसण्याची सोय करण्यात आली असते. इथे प्रवाशांना खुर्च्यांची व्यवस्था असते. एका बस स्टॉपवर बसची वाट पाहत एक तरुण खुर्चीवर बसला होता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता तो आपल्या मोबाईलध्ये काही तरी पाहत आहे. त्याचा मागे काही बायका गप्पा मारत उभ्या आहेत. त्याचा एका बाजूकडून दोन तरुण चालत येत आहे. एका बस स्टॉप जसं वातावरण असतं तसंच या व्हिडीओमध्ये दिसतंय. रात्रीची वेळ आहे, कोणाचा ध्यानीमनी नसताना अचानक समोर एक बस भरधाव वेगाने त्याचा अंगावर चढते.
काळजा ठोका चुकतो, क्षणात काय झालं कोणालाही समजलं नाही. ती बस त्याचा पूर्ण अंगावर चढली, बाजूचा महिलाही घाबरल्या त्या तिथून बाजूला पळाल्यात. त्या तरुणावर बस चढली आणि मागे गेली. एक व्यक्ती त्या तरुणाच्या मदतीला धावत आला. देव तारी त्याला कोण मारी...ही म्हण तुम्ही ऐकली असले. याचाच उदाहरण हा व्हिडीओ आहे. बस त्याचा अंगावरुन परत मागे गेल्या तो तरुण खुर्चीवर तसाच बसला होता आणि त्याला काहीही झालं नव्हतं. या अपघातात तो तरुण सुदैवाने थोडक्यात बचावला होता.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर हा धक्कादायक व्हिडीओ केरळमधील कत्ताप्पना बस स्थानकातील होता, असं सांगितलं जातं. ही घटना 1 डिसेंबरला घडली असून त्या तरुणाचं नाव विष्णू आहे. तो कुमाली, इडुक्की जिल्ह्यातील रहिवाशी होता. बसची वाट पाहत कत्ताप्पना बस स्थानकावर बसला असताना त्याचासोबत ही दुर्घटना घडली.
Man Survives After bus Runs over him at Kattappana Bus Stand, Keralapic.twitter.com/xaqSHVhiug
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 3, 2024
घटनेनंतर, स्थानिक नागरिकांनी विष्णूला खाजगी रुग्णालयात नेले असता त्याला प्राथमिक उपचार देण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला गंभीर इजा झाली नाही आणि तो या अपघातातून थोडक्यात बचावला आहे. दरम्यान बस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, ज्यामुळे हा अपघात घडला. बस रिव्हर्स गिअरमध्ये ठेवली गेली होती, मात्र तो गिअर फेल झाला आणि त्यामुळे बस पुढे गेली आणि ही घटना घडली