Mahayuti Government Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीची जय्यत तयारी सुरु असताना एकनाथ शिंदे अद्यापही मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळपर्यंत याबाबत निर्णय होईल असं सांगितलं आहे. दरम्यान अजित पवार यांनी मात्र आपण सरकारमध्ये सामील होणार असल्याचं जाहीर करुन टाकलं आहे. यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन दिली.
राज्यात सरकार स्थापन कऱण्यासाठी राज्यपालांनी महायुतीला निमंत्रण दिलं आहे. दरम्यान राज्यपालांची भेट घेतल्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी आपल्या भूमिका मांडल्या. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरुन एकनाथ शिंदे अद्यापही मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी तयार नसल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळपर्यंत तुम्हाला उत्तर मिळेल असं सांगितलं आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी मी तर शपथ घेतोय असं सांगितल्यानंतर एकच हशा पिकला.
तुम्ही आणि अजित पवार उद्या शपथ घेणार का? असं विचारलं असता एकनाथ शिंदे उत्तर देत होते की, संध्याकाळपर्यंत थांबा. तेवढ्यात अजित पवार म्हणाले, "संध्याकाळपर्यंत त्यांचं समजणार आहे. मी तर घेणार आहे. मी थांबणार नाही". त्यावर टोला लगावत एकनाथ शिंदे म्हणाले, "अरे दादांना तर अनुभव आहे दुपारीही घेण्याचा आणि सकाळीही घेण्याचा". यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. पुढे अजित पवार म्हणाले की, "पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती. राहून गेलं होतं ते आता पुढचं 5 वर्षं ठेवणार आहे". आमच्यात कोणताही गोंधळ नाही असंही त्यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी स्पष्ट केलं.
"मी एकनाथ शिंदे यांना भेटून शिवसेनेच्या वतीने त्यांना मंत्रिमडंळात राहण्याची विनंती केली आहे. शिवसेना, महायुतीच्या सर्व आमदारांची तशी इच्छा आहे. त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसंच संध्याकाळी किती लोकांचा शपथविधी होईल याची माहिती दिली जाईल असं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद हे आमत्यासाठी फक्त तांत्रिक व्यवस्था आहे असंही ते म्हणाले.
दरम्यान प्रसारमाध्यमांनी एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याबद्दल विचारलं असता त्यांनी संध्याकाळपर्यंत वाटा पाहा असं सांगितलं. "संध्याकाळी सांगतो असं म्हटलं आहे ना. देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी त्यांचे, महायुतीच्या आमदारांचे आभार मानतो," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
"अडीच वर्षात आम्ही इतकं काम केलं असताना त्यातील आठवणीतला एक क्षण सांगणं कठीण आहे. आमचे सर्व निर्णय ऐतिहासिक होते. सुवर्णअक्षरात हे निर्णय लिहिले जातील," असं एकनाथ शिंदे म्हणाले. माझी तब्येत चांगली आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
NZ
(50 ov) 300/8
|
VS |
IND
306/6(49 ov)
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.