झुकेगा नहीं...! 'पुष्पा स्टाईल'ने टरबूज केले ट्रान्सपोर्ट, Video सोशल मीडियावर Viral

सोशल मीडियावर एका पेक्षा एक असे सरस व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळते. काही व्हिडीओ इतके जबरदस्त असतात की, शेअर करण्याशिवाय पर्याय उरत नाही.

Updated: Oct 9, 2022, 05:19 PM IST
झुकेगा नहीं...! 'पुष्पा स्टाईल'ने टरबूज केले ट्रान्सपोर्ट, Video सोशल मीडियावर Viral  title=

Watermelons in Water in Pushpa Style: सोशल मीडियावर एका पेक्षा एक असे सरस व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळते. काही व्हिडीओ इतके जबरदस्त असतात की, शेअर करण्याशिवाय पर्याय उरत नाही. असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे. काही दिवसांपूर्वी पुष्पा चित्रपट फार गाजला होता. या चित्रपटात चंदनाची तस्करी करण्यासाठी नदीच्या प्रवाहाचा वापर केल्याचे दृश्य दाखविण्यात आले होते. मात्र, पुष्पालाही मागे टाकण्याचा कारनामा एका शेतकऱ्याने केला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे.

शेताजवळ असलेल्या स्वच्छ पाण्याच्या कालव्यातून टरबूज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. टरबूज वाहतुकीसाठी कोणतेही यंत्र न वापरता शेताच्या जवळून वाहणाऱ्या पाण्यातून वाहतूक केली जात आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच तो लगेचच व्हायरल झाला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपटाने रुपेरी पडद्यावर तसेच सोशल मीडियावरही खूप धमाल केली होती. लोकांनी त्याच्या गाण्यांवर आणि संवादांवर खूप व्हिडिओ बनवले. सध्या हा नवीन व्हिडीओ समोर आला आहे.