लग्न मंडपात नवरी खेळू लागली कबड्डी, पण का? पाहा व्हिडीओ

या व्हायरल लग्नाच्या व्हिडीओमध्ये नववधूची अगदी बिंधास्त शैली पाहायला मिळत आहे.

Updated: Jul 25, 2021, 06:32 PM IST
लग्न मंडपात नवरी खेळू लागली कबड्डी, पण का? पाहा व्हिडीओ

मुंबई : बदलत्या काळाबरोबर सगळेच बदलतात, माणसांबरोबरच परंपरा देखील बदलताता. एका लग्नात असेच एक दृष्य पाहायला मिळेले आहे. पूर्वीच्या काळात नववधू लग्नात लाजायच्या, त्यांची नजर देखील वर उचलायची नाही. परंतु आता काळाप्रमाने ते देखील बदललं आहे. आजच्या मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालतात, त्यामुळे त्यांचा थाट देखील वेगळाच असतो.

सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल लग्नाच्या व्हिडीओमध्ये नववधूची अगदी बिंधास्त शैली पाहायला मिळत आहे. तसे पाहाता हा व्हिडीओ लोकांना खूप हसवत आहे. परंतु या नववधूमुळे लग्नात उपस्थित लोकांना मात्र फार त्रास सहन करावा लागला आहे.

सोशल मीडिया साइटवर जोरदार व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये नववधू आणि नवरदेव दोघेही स्टेजवर एकमेकांना वरमाळा घालण्यासाठी उभे आहेत. त्यावेळेला वधू अगदी आरामात वराच्या गळ्यात वरमाळा घालते, पण जेव्हा वराची वधूच्या गळ्यात माळा घालण्याची वेळ येते, तेव्हा वधू त्याला ती माळा घालायाला देत नाही. नवरदेव जेव्हा आणखी प्रयत्न करतो तेव्हा ही वधू स्टेजवर पळत सुटते आणि नवऱ्यासोबत चक्कं तिचा कबड्डीचा खेळ रंगतो.

नववधू स्टेजवर उपस्थित सोफा आणि वस्तुंच्या मागून पळते जेणे करुन ती लवकर नवऱ्याचा हातात येण नाही, मग अखेर काही पाहूणे मंडळींना या सगळ्यात पडावे लागते. त्यानंतर मग संधीचा फायदा घेत नवरदेव नवरीच्या गळ्यात लग्नाची माळ घालतोच.

हे सगळ सुरु असताना लग्नाला उपस्थित मंडळींना हा सोहळा पार पाडण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागली परंतु हा एक मजेदार क्षण होता.

या व्हिडीओवर सोशल मीडयावर अनेक लोकांनी खोचक कमेंट्स केल्या आहेत. काही जणांना वधूचे हे वागणे आवडले नाही, कारण त्यांच्यामते लग्न म्हणजे खेळ नाही. तर काही लोकांनी यावधूच्या अशा बिंधास्त वागण्याचे कौतुक केलं आहे. तर काही जण वराच्या मित्रांचे कौतुक करीत आहे. त्यांच्याशिवाय हा पुष्पहार सोहळा पूर्ण करणे शक्य नव्हते.