Viral News: नवरीला पाहिल्यानंतर भरमंडपातून नवरदेव का झाला 'नौ दो ग्यारह'?

नवरीला अशा परिस्थितीत सोडून जाण्याची वेळ का आली नवरदेवावर....  

Updated: Jul 19, 2021, 10:34 AM IST
Viral News: नवरीला पाहिल्यानंतर भरमंडपातून नवरदेव का झाला 'नौ दो ग्यारह'?

नवी दिल्ली : सध्या लग्न सराई असल्यामुळे लग्नामंडपातील अनेक किस्से समोर येत आहेत. कधी नवरी मंडपात डान्स करत येते  तर कधी नवरा होणाऱ्या बायकोला इम्प्रेस करण्यासाठी कहीतरी शक्कल लढवता आपण बघीतलं असेल. सोशल मीडियाच्या जगात असे व्हिडिओ तुफान व्हायरल होतात. पण आता व्हायरल होत असललेल्या व्हिडिओमध्ये तर नवरदेवाने चक्क भरमंडपातून पळ काढला आहे.  तेव्हा लग्नमंडपात जमलेल्या सर्व पाहुण्यांना मोठा धक्का बसला. 

मंडपात नवरी बसलेली असते.  विधी सुरू असतात. नवरीच्या डोक्यात  कुंकू भरण्यासाठी  नवरदेव राहीला तेव्हा तो चक्क घाबरून पळून गेला. सोशल मीडियावर व्हायरल होत असेलल्या व्हिडिओमध्ये नवरी मंडपात बसलेली असते. कुंकू भरण्याची विधी सुरू असते. तेव्हा नवरदेव नवरीच्या डोक्यात कुंकू भरण्यासाठी उभा राहतो. 

तेव्हा नवरीला काही अडचण येते आणि ती जमीनीवर पडते. असा प्रकार पाहून नवरदेव घाबरतो आणि भरमंडपातून पळ काढतो.  नवरीला अशा परिस्थितीत पाहून तो गोंधळून जातो. त्यानंतर तो गळ्यातील हार काढून फेकून देतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ निरंजन महापात्राने शेअर केला. व्हिडिओला आतापर्यंत 12 लाखपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे.