लग्नाच्या दिवशी वधू-वरामध्ये झालं तुफान भांडण; नक्की काय घडलं? पाहा Viral Video

Bride groom fighting video : सोशल मिडीयावर एक व्हिडीओ वायरल होत आहे. यामध्ये भर मंडपात वराने आपल्या वधूला थोबाडीत मारली. 

Updated: Oct 28, 2022, 04:42 PM IST
लग्नाच्या दिवशी वधू-वरामध्ये झालं तुफान भांडण; नक्की काय घडलं? पाहा Viral Video  title=

Bride groom fighting video :  लग्न कधी कधी लग्नात अशा काही घटना घडतात, ज्यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. अनेक लग्नात अशा घटना घडतात, ज्या फारच मजेदार असतात आणि त्या घटना आयुष्यभर सर्वांच्या लक्षात राहातात. हा दिवस वधू (groom and bride)  आणि नवरदेवासाठी देखील महत्वाचा दिवस असतो. कारण त्यानंतर त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार असेल. त्यामुळे या दिवशी सगळ्या गोष्टी चांगल्याच व्हाव्यात अशी नववधू आणि नवरदेवाची इच्छा असते. परंतु एका लग्नात काही भलतंच घडलं. ज्यामुळे या लग्नातील व्हिडीओ ट्रेंड होऊ लागला आहे.  

लग्नाचा हंगाम सुरू झाला असून आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे लग्नाचे व्हिडीओ येऊ लागले आहेत. अशाच एका व्हिडीओमुळे (video viral) सध्या खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये, स्टेजवर उभ्या असलेल्या वधू-वरामध्ये किरकोळ कारणावरून भांडण होते आणि ते एकमेकांना कानाखाली मारू लागतात. ज्यामुळे या लग्नातील व्हिडीओ ट्रेंड (trending video)  होऊ लागला आहे.  

वाचा : पाकिस्तानला 'मिस्टर बीन’ची उपमा देऊन सेहवागने चोळलं जखमेवर मीठ!    

वराला येतो राग

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या (video viral) व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू-वर (groom and bride) स्टेजवर उभे आहेत. त्यावेळी लग्न मंडपात वरमाला समारंभात वर आपल्या वधूला मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करत आहे. वधू तोंड उघडत नाही आणि खात नाही. यावर, वराने चेष्टेने वधूच्या चेहऱ्यावर मिठाई मारली आणि नंतर बदला घेण्यासाठी वधूनेही वरावर मिठाई फेकली. वधूच्या या कृत्याचा वराला खूप राग येतो आणि तो स्टेजवरच सर्वांसमोर वधूला दोन-तीन चापट मारतो. यानंतर लग्नाच्या मंडपात एकच गोंधळ उडतो.

व्हिडीओ वायरल

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक असेही म्हणू लागले आहेत की, वधू-वरांच्या (groom and bride) भांडणाचा हा व्हिडीओ खोटा असून त्यात अभिनय स्पष्ट दिसत आहे. हे प्रकरण कुठले आहे किंवा या व्हिडीओमागील सत्य काय आहे, याची सध्या तरी पुष्टी झालेली नाही. सोशल मीडियावर लोक हा व्हिडीओ एकमेकांना शेअर करत आहेत आणि त्यांची खिल्ली उडवत आहेत.