मुंबई : फुड डिलेवरी कंपनी झोमॅटोने गुंतवणूकदारांच्या विश्वास सार्थ ठरवला आहे. कंपनीने स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे. इश्यु प्राइजच्या 76 रुपयांच्या प्रमाणात झोमॅटोचा शेअर BSE वर 116 रुपयांवर लिस्ट झाला आहे. तसेच आज 138 रुपयांचा हाय बनवला आहे. ज्यांनी आयपीओमध्ये पैसे गुंतवले होते त्यांना एका तासात 81 टक्के रिटर्न मिळत आहेत. सध्या गुंतवणूकदारांनी काय करायला हवे. शेअर लॉंगटर्मसाठी होल्ड करावा का? की नफा बुक करून बाहेर पडावे याबाबत झी बिझिनेसचे संपादक अनिल सिंघवी यांनी सल्ला दिला आहे.
लॉंगटर्मसाठी स्टॉक होल्ड करा
अनिल सिंगवी यांनी म्हटलं की, जर गुंतवणूकदारांना शेअर अलॉट झाले आहेत. तर त्यांनी दीर्घ काळासाठी गुंतवणूक करायला हरकत नाही. जर गुंतवणूकदारांनी अद्याप गुंतवणूक केलेली नाही तर या स्टॉकमध्ये घसरणीची वाट पहावी. स्टॉक साधारण 90 रुपयांपर्यंत आल्यास पोर्टफोलिओमध्ये सामिल करा.
अनिल सिंघवी यांचे म्हणणे आहे की, कंपनीचे ज्या पद्धतीचे बिझिनेस मॉडेल आहे. त्याप्रमाणे येत्या काळात कंपनीच्या प्रगतीची शक्यता अधिक आहे. भारतातील 7 ते 8 टक्के लोक हॉटेल किंवा रेस्टॉंरंटमध्ये जाऊन जेवण करण्यापेक्षा ऑनलाईन जेवण मागवणं पसंत करतात. चीनमध्ये हेच प्रमाण 53 टक्के आहे. आणि अमेरिकेत हे प्रमाण 38 टक्के आहे. त्यामुळे झोमॅटोला भारतात व्यवसाय वाढवण्याचा मोठा स्कोप आहे.