रशियाची Sputnik V लशीचा भारतात वापर कधी सुरू होणार? वाचा रिपोर्ट

रशिया निर्मित लस स्पुटनिक वी ची पहिली खेप 1 मे रोजी भारतात पोहचली होती. या लसीला भारतात येऊन 10 दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले आहेत

Updated: May 14, 2021, 12:46 PM IST
रशियाची Sputnik V लशीचा भारतात वापर कधी सुरू होणार? वाचा रिपोर्ट title=
representative image

नवी दिल्ली : रशिया निर्मित लस स्पुटनिक वी ची पहिली खेप 1 मे रोजी भारतात पोहचली होती. या लसीला भारतात येऊन 10 दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले आहेत. ही लस नक्की कधीपासून वापरात येईल याबाबत अद्यापतरी स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. भारतात लसीकरण 2021च्या सुरूवातीपासूनच सुरू झाले आहे. त्यानंतर भारतात दुसऱ्या लाटेने आक्रमण केल्याने लसीचा तुटवडा जाणवू लागला. 

सध्या भारतात 3 लाखाहून अधिक कोरोना रुग्णांचे निदान होत आहे. अशावेळी भारतात तातडीने लसीची गरज होती. परंतु भारतात सध्या लसीची कमतरता भासत आहे.  अनेक राज्यांनी रशियाच्या लसीबाबतच्या वापराबाबत माहिती देण्याविषयी केंद्राला कळवले आहे.

स्पुटनिक वी लसीची पहिली 1 लाख 50 हजार लसींची खेप  मे च्या सुरूवातीलाच पोहचली होती. परंतु प्रोटोकॉलनुसार हिमाचल प्रदेशातील कसोली स्थित केंद्रीय औषधी प्रयोगशाळेत परिक्षणासाठी रशियन लसीचे 100 नमूने पाठवण्यात आले आहेत. परंतु 14 दिवसांनंतरही परिक्षण पूर्ण झाले नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

परदेशी लसीची चाचणी का केली जाते ?

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्य कोणत्याही देशातून आयात करण्यात आलेल्या लसीचे प्रोटोकॉल आहेत. ते प्रोटोकॉल भारताच्या ड्रग कंन्ट्रोलर जनरलद्वारा निर्धारित करण्यात आले आहेत. त्यांच्या ठरलेल्या पद्धतीप्रमाणे लसीचे परिक्षण केले जाते.

परिक्षणाचे निकाल साधारण 10 दिवसात येतात, लशीच्या परिक्षणानंतर तिला मंजूरी देण्याचा कालावधी 28 वरून 10 दिवसांवर आला आहे. खरेतर अद्यापही अमेरिका, एफडीए, किंवा डब्लूएचओ तसेच युरोपियन औषध नियामकांकडून स्पुटनिक वी ला मंजूरी देण्यात आलेली नाही. त्यातही भारतात ही लस पहिल्यांदाच आली असल्याने तिच्या सविस्तर परिक्षणासाठी वेळ जात आहे.