राम मंदिर कधी बांधणार? शिवसेनेचा मोदींना सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा काढला.

Updated: Jul 16, 2017, 05:18 PM IST
राम मंदिर कधी बांधणार? शिवसेनेचा मोदींना सवाल title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा काढला. राम मंदिर कधी बांधलं जाणार असा सवाल करत मोदींच्या याच कालावधीत राम मंदिर उभारण्याची मागणी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंनी केली आहे. राम मंदिरासाठी दगड नेले जात आहेत मग वाट कशाची पाहिली जात आहे, असंही खैरे म्हणालेत.

अमरनाथ यात्रेकरूंवर कसा काय हल्ला झाला? गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना उचला असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी चीनी वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी खैरेंनी केली आहे.

याचबरोबर नोटबंदीच्या काळात अनेक पैसे पडून राहिले. तेवढं व्याज बुडालं आहे. या व्याजाची परतफेड करण्याचे आदेश सरकारनं द्यावेत असं वक्तव्य खैरेंनी केलं आहे.