Prime Minister Narendra Modi Smartphone: हल्ली दर दुसऱ्या व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन असतात. आयफोन, सॅमसंग, वनप्लस या महागड्या ब्रँडपासून अगदी स्वस्तातला फोन का असेना. पण, स्मार्टफोन सर्रास दिसतोच. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा असाच एक खास स्मार्टफोन वापरतात. ते नेमका कोणता स्मार्टफोन वापरतात याची कल्पना आहे का तुम्हाला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी जो स्मार्टफोन वापरतात तो अद्ययावत तंत्रज्ञानानं परिपूर्ण असून, खास त्यांच्यासाठीच तयार करण्यात आला आहे. या फोनला कोणीही ट्रेस किंवा हॅक करु शकत नाही. काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मोदी जो फोन वापरतात त्याला उच्चस्तरिय संरक्षण प्राप्त आहे. रुद्रा असं या फोनचं नाव सांगितलं जातं. भारत सरकारच्या अख्तयारित येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाकडून या फोनची निर्मिती केली जाते. हा एक अँड्रॉईड फोन असून, त्यामध्ये खास संरक्षणप्राप्त अँड्रॉईड प्रणाली आहे.
हाय एंड स्मार्टफोनव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी संवाद साधण्यासाठी सॅटेलाईट RAX फोनचा वापर करतात. हा फोन मोबाईलहून पूर्णपणे वेगळा असून, तो मिनिटरी फ्रिक्वेन्सी बँडवर काम करण्यासही सक्षम आहे. हा फोनही कोणाला हॅक किंवा ट्रेस करता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन फोनव्यतिरिक्त त्यांचा खासगी मोबाईलही वापरतात. पण, त्यासंदर्भात मात्र सविस्तर माहिती किंवा मोदींच्या कोणत्याही फोनची अधिकृत किंमत समोर येऊ शकलेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार मागील वर्षी मोदींना एक अधिकृत सरकारी स्मार्टफोन देण्यात आला असून, रुद्रा 2 असं या मॉडेलचं नाव. रुद्राच्या तुलनेत हा फोन अधिक अॅडवान्स आणि हाय एंड सिक्योरिटी फिचर्स असणारा आहे. या फोनमध्ये इनबिल्ड चिप देण्यात आली असून, त्यापासून सायबर हल्ल्यापासून फोनचा बचाव होतो असं सांगितलं जातं.