मुंबई : भारतात २० एप्रिलपासून लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल करण्यास सरकारने सुरूवात केली आहे. पण सरकारच्या या निर्णयावर जागतिक आरोग्य संघटनेने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा चेतावणी दिली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबवण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध मागे घेण्याचा विचार इतक्यात करू नका. नाही तर येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा फैलाव अधिक होण्याची शक्यता दाट असल्याचे संकेत जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. दरम्यान भारतात कोरोना रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे. त्यामुळे देशातल्या नागरिकांनी ही महामारीची परिस्थिती आता अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
डब्ल्यूएचओचे वेस्टर्न पॅसिफिकचे प्रादेशिक संचालक डॉ. ताकेशी कासे म्हणाले, सध्या ओढावलेल्या वेळेवर संयमाने विचार करण्याची आहे. त्याचप्रमाणे भविष्यात जगण्यासाठी नव्या योजना आणि स्वत:ला सशक्त बनवण्याची वेळ आहे. असं वक्तव्य त्यांनी केलं. त्याचप्रमाणे नियम शिथिल न करण्यास देखील त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, कोरोना व्हायरसचा संसर्ग अधिक वाढू नये म्हणून सरकार लॉकडाऊन आणि सोशल डिस्टसिंगचे निमय घाई न करता हळू-हळू शिथिल करण्याची गरज आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. या धोकादायक विषणूमुळे मृत्यूसंख्या देखील वाढत आहे. तर दुसरीकडे दिलासादायक गोष्ट म्हणजे या आजारावर मात करून अनेक नागरिक त्यांच्या घरी सुखरूप घरी पोहोचले आहेत.