पत्नीला माहेरी पाठवण्यास पतीचा नकार, चिडलेल्या तिने वाद घातला अन् नको ते होऊन बसले!

Crime News Today: पत्नीने माहेरी जाण्याचा हट्ट धरला. पण पतीने जाण्यास नकार दिला. चिडलेल्या पत्नीने वाद घातला आणि होत्याचे नव्हते घडले.   

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 27, 2024, 02:59 PM IST
पत्नीला माहेरी पाठवण्यास पतीचा नकार, चिडलेल्या तिने वाद घातला अन् नको ते होऊन बसले! title=
Wife adamant on going to maternal home angry husband shot himself

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. होळीनंतर येणाऱ्या भैयादूजसाठी पत्नीला माहेरी जायचे होते. मात्र पतीने तिला जाण्यापासून अडवले. त्यानंतर या दोघांची इतकी भांडणे झाली की वाद टोकाला गेला. पतीने स्वतःवरच गोळी झाडली आहे. या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे तर मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे. मात्र, होळीच्याच दिवशी हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी माहेरी जात होती. त्यामुळं घरात वाद-विवाद झाले. त्याचवेळी नाराज झालेल्या पतीने अवैध बंदुकीतून स्वतःवरच गोळी झाडली. डोक्यात गोळी लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर, वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या मुलालाही छर्रे लागल्याने तो गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. 

राठ नगरच्या सिंकदरपुरा मोहल्ला येथील रहिवाशी असलेल्या सत्यम सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी त्यांचा मामा सोनू सोनी घरी आला होता. भाईदुजसाठी तो आईला घरी नेणार होता. त्यावर वडिल रामहेत सोनी यांनी त्यांना पाठवण्यास नकार दिला. आईला माहेरी जाण्यास नकार दिल्याने ती चिडली होती. मामा घरातून निघाल्यानंतर त्यांच्या घरात वाद-विवाद झाले होते. 

संध्याकाळी 5च्या सुमारास वाद खूप विकोपाला गेला. तेव्हा चिडलेल्या पतीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. सत्यमने म्हटलं आहे की, त्याचा मोठा भाऊ शिवम सोनी याने वडिलांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण वडिलांना डोक्यावर बंदूक ठेवून गोळी झाडली. त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. भावाच्या चेहऱ्यावरही गोळीचे छर्रे उडाले होते. 

शेजाऱ्यांनी शिवमला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यानंतर त्याला मेडिकल कॉलेज झांसी येथे पाठवण्यात आले. शिवमवर उपचार सुरू आहेत. तर, मयत रामहेत हे आर्टिफिशियल ज्वेलरीचे दुकान चालवतात. या प्रकरणी पोलिस अधिकारी दिलीप कुमार सिंह हे तपास करत आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर, जखमींवर उपचार सुरू आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे. 

माहेरी जाण्याच्या विषयावरुन घरात वाद सुरू झाला होता. त्यानंतर याला वैतागून पत्नी तिच्या लहान जाऊकडे गेली होती. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा ती लहान जावेच्या घरात होती व घडलेली घटना सांगत होती. त्याचवेळी तिच्या पतीने गोळी झाडून जीवन संपवले आहे.